शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळात गोंधळ... तब्बल 37 वर्षांच्या गॅपनंतर होणार ते डॉक्टर !

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: February 16, 2024 07:50 IST

विद्यापीठ बदलल्याने निर्माण झाला सावळागोंधळ

रामेश्वर काकडे

नांदेड : आयुर्वेद महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी १९८५ साली  प्रवेश मिळाल्यानंतर  दोन वर्षे शिक्षण घेतले; पण तिसऱ्या वर्षी विद्यापीठ बदलल्याने तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. आता तब्बल ३७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर याच विद्यार्थ्याला तृतीय वर्षाच्या प्रवेशाला मान्यता मिळाली आहे. ही कहाणी आहे नांदेडमधील प्रदीप भुजंगराव घाटे यांची. 

घाटे हे एससी प्रवर्गातून १९८५ साली नांदेडमधील आयुर्वेद महाविद्यालयात आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले. दोन वर्षे त्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेऊन परीक्षा उत्तीर्ण केली. परंतु,  तिसऱ्या वर्षाला त्यांना प्रवेश मिळाला नव्हता. मध्यंतरीच्या काळात आलेल्या कौटुंबिक अडचणी, विद्यापीठ बदलल्याने निर्माण झालेला पेचप्रसंग यावर मात करत अखेर घाटे यांना ३७ वर्षांनी पुन्हा प्रवेश मिळाला.

शिकण्याची जिद्द कायम  nप्रवेश मिळण्यासाठी ३७ वर्षांचा काळ लागला असला तरी  जिद्द सोडली नाही.nअर्धवट राहिलेला अभ्यासक्रम आता पूर्ण करण्याचा निश्चय केला आहे.nअधिष्ठाता वाय.आर. पाटील यांच्या सहकार्यामुळे बीएएमएस करण्याची इच्छा पूर्ण होत आहे, असे घाटे म्हणाले. 

विद्यापीठ बदलले अन्... बदललेले विद्यापीठ, आयुर्वेद विद्यापीठाकडून येणाऱ्या अडचणी यामुळे त्यांना तृतीय वर्षाला प्रवेश मिळाला नाही. तरीही आयुर्वेदाची पदवी मिळवायचीच, ही जिद्द उराशी बाळगून त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला.अखेर आता त्यांना उर्वरित तीन वर्षांसाठी आयुर्वेद पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 

अधिष्ठातांनी आदेश केला जारी  पारंपरिक विद्यापीठामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचा प्रवेश नियमित करून त्याबाबतची नोंदणी करण्याचा व प्रवेश घेण्याचा आदेश शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता वाय.आर. पाटील यांनी जारी केला. नियमित शुल्क भरण्याच्या सूचना करून प्रवेश पूर्ण करून घेण्याबाबत त्यांनी आदेशित केले आहे.  

टॅग्स :Nandedनांदेडdoctorडॉक्टरuniversityविद्यापीठ