शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

'तो' भर रस्त्यात गाडीच्या नुकसान भरपाईसाठी अडून राहिला व पुढच्याच क्षणी त्याला गमवावा लागला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 16:25 IST

समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.

ठळक मुद्देसमोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने यामुळे समीरची पिकअप त्यावर धडकली यामध्ये पिकअपचे बरेच नुकसान झाले. नुकसान पाहण्यासाठी पिकअप खाली पाहत असताना मागून आलेल्या अन्य एका भरधाव ट्रकने (MH-40AK-2977 ) पिकअपला जोराची धडक दिली.

नांदेड : समोरील ट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने पिकअपचे झालेले नुकसान देण्याच्या मागणीसाठी भर रस्त्यात अडून राहिलेला चालक व त्याचा मित्राला अन्य एका ट्रकने धडक दिल्याने आपला जीव गमवावा लागला.  हा विचित्र अपघात आज सकाळी ६ वाजता पैनंगंगा नदीवर झाला. 

माणसाचा मृत्यू अटळ असतो पण तो कुठे व कसा होईल याचा कोणास अंदाज नसतो, याचीच प्रचीती आज सकाळी पैनगंगा नदीवर हदगाव उमरखेड रस्त्यावर झालेल्या अपघातात आली. या बाबत अधिक माहिती अशी कि, पुसद येथिल समीर खान हा त्याच्या पिकअपमध्ये (MH -29 AT-0201) लातूर येथून पुसदला एकाचे दुध भाड्याने घेऊन जात होता. यावेळी गाडीत त्याचा मिञ कुणाल कांबळे व दुध विक्रेते विठ्ठल दोडके हे होते. गाडी सकाळी 4:30 वाजता हदगाव तालुक्यातील पैनंगंगा नदी च्या पुलावरुन जात असताना समोरील ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला. यामुळे समीरची पिकअप त्यावर धडकली यामध्ये पिकअपचे बरेच नुकसान झाले. यावेळी झालेले नुकसान पाहण्यासाठी तिघेही खाली उतरले.  

गाडीचे झालेले नुकसान पाहून समीर ट्रक चालकाला नुकसान भरपाई देण्याबाबत बोलत होता. तसेच त्याने ट्रकच्या चाव्यासुद्धा काढून घेतल्या व नुकसान भरपाईसाठी अडून राहिला. काही वेळाने तिघेही पिकअपचे झालेले नुकसान पाहण्यासाठी पिकअप खाली पाहत असताना मागून आलेल्या अन्य एका भरधाव ट्रकने (MH-40AK-2977 ) पिकअपला जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती कि, समीर व कुणाल यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला व ते जागीच गतप्राण झाले, तर विठ्ठल गंभीर जखमी झाले. 

नातेवाईकांना बसला धक्का अपघात झाला तेव्हा समीर ने गावाकडे नातेवाईकांना फोन करून  अपघाताची माहिती दिली होती. यावेळी त्याने केवळ गाडीचे नुकसान झाले आहे असे सांगितले होते. परंतु, घटनास्थळी येताच दोघांचे मृतदेह दिसल्याने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, या विचित्र अपघातामुळे रस्त्यावरील वाहतुक जवळपास तीन तास विस्कळीत होती. घटनेची माहिती मिळताच हदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक केशव लटपटे, दत्ताञेय वाघमारे, सुदर्शन बेग व ऊमरखेडच्या पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेऊन  वाहतूक सुरळीत केली. 

टॅग्स :Accidentअपघात