शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर तालुक्यात हळदीचे विक्रमी उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:26 IST

अर्धापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने शेतीतील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़ त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळला आहे़

पार्डी : अर्धापूर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाळा कमी होत असल्याने शेतीतील उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे़ उत्पादनात घट होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे़ त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर नगदी पिकाकडे वळला आहे़तालुक्यात प्रामुख्याने केळी पिकाला पसंती दिली जात असे़ परंतु, मागील काही वर्षांपासून पाण्याची कमतरता व अस्मानी संकट केळीच्या मुळावर आले असल्याने केळी पिकाला बगल देऊन शेतकरी हळदीकडे वळला होता़ त्यामुळे गत वर्षात हळदीच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली होती़ वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली होती़गतवर्षात मे महिन्यात हळदीची लागवड केली होती़ ती या वर्षात फेब्रुवारी व मार्च महिन्यात काढणीस सुरुवात झाली आहे़ गेल्या दोन ते तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षात हळदीच्या उत्पादनात मोठी वाढ झालेली आहे़ गेल्या वर्षात एकरी २० ते २५ क्विंटल हळदीचे उत्पादन झाले होते व या वर्षात एकरी ३० ते ४० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत़हळदीमध्ये ५ ते ७ जातींचे हळदीचे बेणे आहे़ त्यात प्रामुख्याने कडप्पा, कृष्णा, राजापुरी, तामिळनाडू, शेलम व शेलम. अर्धापूर तालुक्यात व परिसरात प्रामुख्याने शेलम जातीच्या बेण्याची लागवड करतात़ परंतु पार्डी येथील शेतकरी गजानन देशमुख यांनी गेल्या दोन वर्षांपासून चिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करीत आहेत़ गेल्या वर्षात त्यांना एकरी ३२ क्विंटल हळद झाली होती़ गतवर्षात त्यांनी ७ एकर जमिनीत चिनी, शेलम हळदीची लागवड केली होती़ त्यावर्षी त्यांना भरपूर उत्पन्न झाले होते़ म्हणून, त्यांनी या वर्षात सुद्धा चिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करून भरपूर उत्पादन काढले आहे.हळद लागवडीपूर्वी शेतीत प्रक्रियासर्वप्रथम नांगरलेल्या रानात एकरी चार ट्रॅक्टर शेणखत व प्रतिएकर जमिनीत तीन सुपर दाणेदार व एक पोटॅश मिसळून शेतात शिंपडून जमिनीला रूटर करून ४ फुटांच्या अंतराने बेड मारून त्या बेडवर उपडा वखर टाकून दीड ते पावणेदोन फूट रुंद होईल इतके दाबून बेड तयार केले़ ठिबकद्वारे बेड भिजविण्यात आले व नंतर कोळप्याच्या साह्याने बेडवर चार ते सहा इंच खोल इतक्या रेघोट्या मारण्यात आल्या़ एक बेडवर दोन रेघोट्या मारल्या, दोन रेघोट्याचे अंतर १० ते १२ इंच ठेवण्यात आले़चिनी, शेलम जातीच्या बेण्याची प्रक्रियाचिनी, शेलम जातीच्या बेण्याची लागवड करण्याअगोदर बेणे प्रक्रिया करण्यात आली़ १०० लिटर पाण्यामध्ये ५०० ग्रॅम मिकनेल्फ २०० ग्रॅम बुरशीनाशक २०० गॅ्रम क्लोरोपासरी फॉस मिसळून बेणे बुडवून घेतले़ बेण्याची लागवड केल्यानंतर चार-चार दिवसांच्या अंतराने पाणी देण्यात आले़ हळद लागवड केल्यावर जर पाऊस पडला तर विहीर किंवा बोअरचे पाणी देण्याची गरज राहत नाही़.

जमिनीतील पोत व वातावरणातील बदल किंवा खत व्यवस्थापनानुसार उत्पादनात वाढ किंवा घट होऊ शकते - गजानन देशमुख, शेतकरी, पार्डी ता. अर्धापूर, जि.नांदेड़

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी