शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

हदगावला पावसाचा तडाखा; तामसा नदीवरील पूल वाहून गेला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 17:53 IST

हदगाव-तामसा-किनवट या रस्त्याच्या दुपदरी रस्त्याचे काम सुरू आहे.

हदगाव: दोन दिवसांपासुन संततधार पावसामुळे तामसा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे हदगाव-भोकर तालुक्यातील वाहतूक दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे.

हदगाव-तामसा-किनवट या रस्त्याच्या दुपदरी रस्त्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तामसा गावालगत असलेल्या नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. जुना पुल पाडुन नवीन पुलाचे काम सुरू केले आहे. पर्यायी व्यवस्था म्हणुन याच नदीवर पाईप टाकुन तात्पुरती वाहतूक सुरू करण्यात आली होती. पण दोन दिवसांपासून पावसाने जोर धरल्यामुळे नदीला रविवारी रात्री पुर आला. त्यामध्ये पुलाची एक बाजू पूर्णपणे वाहून गेली आहे. 

शेतकरी अडकुन पडलेशहरातल्या पैलतिराकडील संपर्क तुटल्याने शेतमजूर, वाडी, तामसा तांडा व प्राथमिक आरोग्य केंद्र येथिल नागरीकांना शहरात येण्यासाठी पर्यायी व्यवस्था नाही. सोमवारी दि.१७ रोजी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहतूक खोळंबली होती हदगाव भौकर या दोन तालुक्यांना जोडणारा हा पूल आहे दोन दिवसांपासून वाहतूक बंद झाली आहे नदीचे पाणी कमी झाल्याशिवाय येथे पर्यायी व्यवस्था करता येणार नसल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

ऐन पावसाळ्यात पुलाचे काम या पुलाचे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करणे संबंधित गुत्तेदारास बंधनकारक होते. पण ऊन्हाळयात हे काम ढेपाळले व ऐन पावसाळ्यात काम सुरू केल्यामुळे पोळा सणाच्या पूर्वसंध्येला पुल वाहून गेल्याने शेतकरी व व्यापारी यांना मोठी अडचण येत आहेत. वाहन चालकांना पर्याय उपलब्ध नसल्याने वाहतूक खोळंबली आहे. पावसाळ्यात काम सुरू केल्याने पूल वाहून जाणार नाही तर काय होईल असा संताप परिसरातील शेतकरी व्यक्त करत आहेत.

टॅग्स :floodपूरNandedनांदेडRainपाऊस