शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमध्ये ३५ गोण्यात आढळून आला ३७ लाखांचा गुटखा; नांदेड ग्रामीण पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 19:22 IST

नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोंढार बायपास येथे कारवाई

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बोंढार बायपास येथे कारवाई करत तब्बल ३५ गोण्यातील ३७ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई १ एप्रिल रोजी रात्री साडेअकरानंतर करण्यात आली. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ट्रकचालक सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तर इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीअंतर्गत बोंढार बायपास येथे १ एप्रिल रोजी एका ट्रकमधून ( केए-३९, ८०२७ ) अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. यावरून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी आणि अन्न व सुरक्षा अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने रात्री ११.३० वाजेच्या सुमारास ट्रक आडवून तपासणी केली. यावेळी त्यात ३५ गोण्यांमधील तब्बल ३६ ते ३७ लाख रूपयांचा गुटखा आढळून आला. ही कारवाई अन्न व सुरक्षा अधिकारी उमेश कावळे, अन्न व औषधी प्रशासन विभागातील अधिकारी प्रविण काळे व नांदेड ग्रामीण ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोउपनि एन. बी. कुंडगीर, नाईक पो.कॉ. प्रभाकर मलदोडे, नाईक पो.कॉ. श्याम नागरगोजे, पो. कॉ. शिवा पाटील व पो कॉ. चंद्रकांत स्वामी यांनी प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

याप्रकरणी ट्रकचालक रौफ इनामदार व त्याच्या तीन साथीदारांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार तथा सपोउपनि. डी. एन. मोरे यांनी दिली. दरम्यान, चालक रौफ इनामदार सद्या नांदेड येथील एका खाजगी रूग्णालयात औषधोपचार घेत आहेत. पुढील तपास प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड करत आहेत. या गुन्ह्यात अनेक व्यक्तींचाही समावेश असण्याची दाट शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा पकडला असल्याने या व्यवसायात गुंतलेल्या अनेकांचे धाबे दणाणले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड