लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड :तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दीपावली आणि श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचा ३१० वा गुरु-त्ता- गद्दी पर्वानिमित्त पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ या दरम्यान विशेष समागम आयोजित करण्यात आला आहे़६ नोव्हेंबर रोजी तख्तस्नान होणार आहे़ ७ रोजी दीपमाला (बंदीछोड दिवस), ८ नोव्हेंबरला दीपमाला महल्ला (हल्लाबोल), ९ रोजी गुरुपुरब दुज नगरकीर्तन श्री गुरुग्रंथ साहिबजी यांची गुरु-त्ता-गद्दी नशीनी गुरपुरब आणि गुरमत समागमचे उद्घाटन करण्यात येणार आहे़ १२ रोजी पंचमी सचखंड गमन पातशाही १० वी, श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज आणि १३ नोव्हेंबरला समाप्ती गुरमत समागम व नगरकीर्तन काढण्यात येणार आहे़ गुरमत समागममध्ये पंथ प्रसिद्ध रागी, धर्म प्रचारक भाई लखविंदरसिंघ, भाई कमलजितसिंघ, भाई अमनदीपसिंघ, भाई देविंदरसिंघ सोडी, भाई सतविंदरपालसिंघ, भाई अरविंदरजित सिंघ, कथाकार- ग्यानी हरिंदरसिंघ, गिआनी रणजितसिंघ गोहर, गिआनी सुखदेवसिंघ यांचे प्रवचन होणार आहे़ दररोज रात्री साडेसात वाजेपासून श्री गुरु ग्रंथ साहिब भवन येथे हे कार्यक्रम होणार आहेत़१५ ला सिमरन दिवसतख्त सचखंड श्री हजूर साहिब अबचलनगर येथे २००७ पासून गुरु-त्ता- गद्दीनिमित्त सिमरन दिवस (विश्वशांती) चे आयोजन १५ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे़ सिमरन दिवस म्हणून विश्वशांतीची अरदास करण्यात येते़ पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली संतांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे़
गुरु-त्ता-गद्दी गुरपुरबची जय्यत तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:58 IST
तख्त सचखंड श्री हजूर साहिब येथे दीपावली आणि श्री गुरु ग्रंथ साहिबजी यांचा ३१० वा गुरु-त्ता- गद्दी पर्वानिमित्त पंजप्यारे साहिबान यांच्या मार्गदर्शनाखाली ९ नोव्हेंबरपासून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़
गुरु-त्ता-गद्दी गुरपुरबची जय्यत तयारी
ठळक मुद्दे९ ते १३ नोव्हेंबरदरम्यान विविध कार्यक्रम