शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 00:32 IST

येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांनी सांगितले.

ठळक मुद्देव्यवस्थापन समिती : ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत घ्यावी लागणार मंजुरी

नांदेड : येथील श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचा १०४ कोटींचा अर्थसंकल्प व्यवस्थापन समितीने मंजुरीसाठी गुरुद्वारा बोर्डापुढे सादर केला आहे. ३१ मार्चपूर्वी बोर्डाच्या बैठकीत या अर्थसंकल्पाला मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरुविंदरसिंघ वाधवा यांनी सांगितले.व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी व्यवस्थापन समितीची अर्थसंकल्पीय बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रारंभी पुलवामा येथे झालेल्या दशहतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत गुरुद्वारा सचखंड बोर्डाचा २०१९-२० चा प्रस्तावित १०४ कोटींचा अर्थसंकल्प बैठकीत ठेवण्यात आला. यठा अर्थसंकल्पावर चर्चा करताना स. नवनिहालसिंघ जहागीरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी व्यापारी संकुल, फंक्शन हॉल, यात्रीनिवास आदींचे निर्माण करावे, अशी सूचना केली. यासाठी आराखडा तयार करण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांकडे सोपवावी, असेही ते म्हणाले. स. गुलाबसिंघ, स. रवींद्रसिंघ यांनीही या चर्चेत सहभाग घेताना गुरुद्वारा बोर्डाकडून अन्नधान्यासाठी वेअर हाऊस, वाशिंग प्रोजेक्ट व सोलार प्रोजेक्ट लवकर सुरु करुन बोर्डाच्या खर्चात कपात करावी, अशी सूचना केली. यानंतर गुरुद्वारा बोर्डाच्या प्रस्तावित १०४ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली.हा अर्थसंकल्प आता गुरुद्वारा बोर्डाच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. ३१ मार्चपूर्वी हा अर्थसंकल्प मंजूर करावा लागणार आहे.या बैठकीस व्यवस्थापन समितीचे सदस्य गुलाबसिंघ कंधारवाले, स. ठाणसिंघ बुंगई, रवींद्रसिंघ बुंगई, नवनिहालसिंघ जहागिदार, गुरुविंदरसिंघ वाधवा आदींची उपस्थिती होती. या बैठकीत उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांचा बदलीनिमित्त आणि गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे सदस्य स. रवींद्रसिंघ बुंगई बोर्डाच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला.रेल्वेमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावरेल्वे विभागाच्या वतीने नुकतीच नांदेड-देगलूर-बीदर या रेल्वे मार्गास मंजुरी मिळाली आहे. तसेच नांदेड-बीदर हा राष्टÑीय महामार्गामध्ये समाविष्ट करुन तो मंजूर करण्यात आला आहे. या दोन्हीही मार्गाचा शीख यात्रेकरुंना लाभ होणार आहे. बीदर येथील गुरुद्वारा नानकझिरा साहिब येथे हजारो भाविक दर्शनासाठी नांदेडहून ये-जा करीत असतात. या निर्णयाचे गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने स्वागत करण्यात आले. रेल्वेमंत्री पीयूष गोयल व राष्ट्रीय रस्ते महामार्ग परियोजना मंत्री नितीन गडकरी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव घेण्यात आला.

टॅग्स :NandedनांदेडSachkhand Gurudwara Nandedसचखंड गुरुद्वारा नांदेडBudgetअर्थसंकल्प