शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

युद्धाचा फटका मराठवाड्याला! निर्यात कोलमडल्याने 'कांदेबहार' केळी बागायतदारांचे कंबरडे मोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:05 IST

नांदेडमध्ये १८ हजार हेक्टरवरील केळी उत्पादक चिंतेत; खर्च निघणेही झाले कठीण, 'कांदेबहार' केळीला मागणीच उरली नाही.

-श्रीनिवास भोसलेनांदेड : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीने दाक्षिणात्य राज्यांतील केळी निर्यातीवर अचानक ब्रेक लागला असून त्याचे पडसाद आता मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बाजारपेठेत उमटत आहेत. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणावर विदेशात जाणारा केळीचा माल देशातच अडकून पडल्याने स्थानिक बाजारपेठेत मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला. परिणामी मराठवाड्यातील केळी उत्पादकांना दर पडझडीचा फटका बसत आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर आणि नांदेड तालुक्यांत तसेच शेजारील हिंगोली जिल्ह्यातील वारंगा, डोंगरकडा आदी भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जाते. मे ते ऑक्टोबर हा मुख्य हंगाम असला तरी सध्या ‘कांदेबहार’ केळीची आवक सुरू आहे. या काळात दाक्षिणात्य राज्यांतील उत्पादन अधिक असते आणि तो माल प्रामुख्याने दुबई, इराण, इराक, कतार आदी आखाती देशांत निर्यात केला जातो. मात्र यंदा युद्धामुळे निर्यात कोलमडल्याने हा संपूर्ण माल देशांतर्गत बाजारात वळवला गेला आहे. त्याचा थेट परिणाम म्हणजे बाजारात उच्च दर्जाच्या केळीचा ओव्हर सप्लाय निर्माण झाला आहे. पूर्वी विदेशात जाणारा माल आता स्थानिक बाजारात कमी दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्थानिक दुय्यम दर्जाच्या केळीला मागणीच उरलेली नाही. व्यापारीही सावध भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना अक्षरशः तोट्यात व्यवहार करावे लागत आहेत. एप्रिल-मेपासून मोठ्या प्रमाणावर उत्पादन बाजारात येणार असताना हीच परिस्थिती कायम राहिली, तर मुख्य हंगामात दर आणखी घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

देशांतर्गत बाजारपेठ कोलमडलीयुद्धामुळे केळी निर्यात घटली. दाक्षिणात्य राज्यातून विदेशात जाणारा उच्च दर्जाचा माल देशातच अडकला आहे. हा माल पंजाब, हरयाणा, दिल्ली, चंडीगड आदी राज्यासह उत्तर भारतातील बाजारपेठांत वळवला गेला आणि स्पर्धा वाढली. परिणामी मराठवाड्यातील केळी मागे पडली आणि दरांमध्ये घसरण झाली. पूर्वी अडीच हजार रूपये क्विंटलप्रमाणे मिळणारा भाव चांगल्या दर्जाचा केळीला १००० ते १२०० रूपये मिळत आहे.

नांदेडात सर्वाधिक केळी लागवडराज्यात जवळपास सव्वा ते दीड लाख हेेक्टरवर केळीची लागवड केली जाते. जळगाव पाठोपाठ नांदेडात सर्वाधिक १८ ते २० हजार हेक्टरवर केळी लागवड होत असून यामध्ये अर्धापूर, मुदखेड, भोकर, नांदेड तालुके आघाडीवर आहेत.

खर्च जास्त, भाव कमी; गणितच बिघडलेकेळी नगदी पीक असून उत्पादनासाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र सध्याच्या ६०० ते ७०० रुपये दरामुळे काढणी, वाहतूक आणि मजुरी खर्चही निघत नाही. अपेक्षित किमान १५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळणे गरजेचे असताना सध्याचे दर शेतकऱ्यांना तोट्यात ढकलत आहेत. त्यामुळे केळीच्या बागात जनावरे सोडण्याची वेळ आली आहे.- संदीप गावंडे, केळी उत्पादक शेतकरी

English
हिंदी सारांश
Web Title : War hits Marathwada: Banana exports collapse, farmers face huge losses.

Web Summary : Marathwada banana farmers suffer as war disrupts exports from southern states. Oversupply in domestic markets leads to price drops, pushing farmers into losses. Production costs exceed returns.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFarmerशेतकरीBananaकेळीNandedनांदेड