शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड मनपाच्या प्रस्तावांना पालकमंत्र्यांची कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:06 IST

महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देदलित वस्ती निधी : पालकमंत्र्यांनी सुचविली २१ नवीन कामे, सत्ताधारी नगरसेवक नाराज

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महापालिकेच्या दलित वस्ती निधीअंतर्गत २०१७-१८ च्या ७० कामांना प्रशासकीय मंजुरी देताना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांना पालकमंत्र्यांकडूनच हरताळ फासला असून मनपाने प्रस्तावित केलेले कामे रद्द करुन प्रस्ताव नसलेली २१ कामांचे आदेश दिले आहेत.महापालिकेने २०१७-१८ च्या दलित वस्ती निधीअंतर्गत १५ कोटी ७९ लाख रुपयांच्या कामाचे ६५ प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविले होते. यामध्ये महापालिकेने ६४ कामे सुचवली होती. या कामांना मंजुरी दिल्याबाबतचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी १९ एप्रिल २०१८ रोजी महापालिका आयुक्तांना पाठविले. मात्र ही प्रशासकीय मान्यता देताना महापालिकेने प्रस्तावित केलेल्या ६४ कामांपैकी १७ कामे रद्द केली आहेत. तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनीच नवीन २१ कामे सुचवली असून यात बहुतांश कामे ही समाजमंदिर बांधकामाचे आहेत. तसेच पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामामध्ये सिडकोच्या मुख्य रस्त्याचे तब्बल २ कोटींचे कामही रद्द केले आहे. त्याचवेळी शहरातील जयभीमनगर ही पूर्णत: दलित वस्ती असल्याने या प्रभागातील अंतर्गत रस्ते, नाल्या तसेच ड्रेनेजलाईनची ५५ लाखांची कामे आहेत. तसेच भीमवाडी या नवीन नांदेडातील वस्तीतील २३ लाखांचे कामेही रद्द केली़ प्रभाग क्र. १३ मध्ये शांतीनगर, विणकर कॉलनी हे पूर्णत: मागास भाग असल्यामुळे जवळपास ५० लाखांची कामे मनपा सभागृहाने या प्रभागात सुचवली होती. मात्र त्या कामांनाही कात्री लावण्यात आली आहे. तर गोकुळनगर भागातही सुचवलेले ७६ लाखांचे काम रद्द केले आहे. पालकमंत्र्यांनी नव्याने सुचवलेल्या २१ कामांमध्ये जवळपास १० कामे समाजमंदिर बांधकाम व दुरुस्तीचे आहेत तर काही कामे सीसी रस्ता व नाल्यांची आहेत. पालकमंत्र्यांनी सुचवलेल्या २१ कामांचा महापालिकेच्या प्रस्तावात आणि ठरावामध्ये समावेश नाही. तसेच या २१ कामांसंदर्भात समाजकल्याण अधिका-यांचा स्थळ- पाहणी अहवाल नसल्याचे जिल्हाधिका-यांनी स्पष्ट केले़ त्यामुळे पालकमंत्र्यांनी सुचवल्याप्रमाणे नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेशही जिल्हाधिकाºयांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.महापालिकेने प्रस्तावित केलेली कामे रद्द करणे ही बाब चुकीची असल्याचे सभागृहनेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले यांनी सांगितले. प्रस्ताव नसतानाही नवीन कामे आली कशी? मनपाच्या प्रस्तावाविना कामे घेण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना आहेत काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्याच वेळी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत. मनपा सभागृह त्याला तीव्र विरोध करेल, असेही गाडीवाले म्हणाले़कामे सुचवण्याचे अधिकार हे महापालिका सभागृहाचेच आहेत. पालकमंत्र्यांना त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही. केवळ काम कुणी करायचे? सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचे की महापालिकेने करायचे? हा निर्णय पालकमंत्री घेऊ शकतात. कामे सुचवण्याचे सर्व अधिकार महापौर आणि सभागृहाचे आहेत. या अधिकारावर गदा येत असेल तर न्यायालयात धाव घ्यावी लागेल, असे माजी महापौर अब्दुल सत्तार यांनी सांगितले.पालकमंत्र्यांनी दिले उत्तर - नांदेडला प्राधान्यदलित वस्ती निधीअंतर्गत पालकमंत्र्यांनी रद्द केलेल्या कामांमध्ये सिडकोच्या प्रमुख रस्त्याचाही समावेश आहे. दोन कोटी रुपयांचे हे काम रद्द केले आहे. त्यासह प्रभाग २० मधील २, प्रभाग १९ मधील दोन तसेच प्रभाग १३ मधील दोन कामांचाही समावेश आहे. दक्षिण नांदेडातील ही कामे रद्द करताना पालकमंत्र्यांनी सुचवलेली कामे ही पूर्णत: उत्तर नांदेड मतदारसंघातील आहेत. केवळ एक काम वगळता प्रभाग १, २, ३ आणि प्रभाग ९ मध्ये पालकमंत्र्यांनी नवीन कामे सुचवली आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRamdas Kadamरामदास कदमcollectorतहसीलदार