शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
3
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
4
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
5
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
6
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा
7
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
8
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
9
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
10
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
11
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले १३ हजार अश्लील फोटो, मुंबई पोलिसांनाही बसला धक्का
12
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
13
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
14
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
15
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
16
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
17
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
18
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
19
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
20
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या

पालकमंत्र्यांनी फिरविली नांदेडकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:54 IST

भीमा कोरेगाव घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान हदगाव तालुक्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर मात्र नांदेडमध्ये फिरकले नाहीत. विशेष म्हणजे ते गुरुवारी नांदेडमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : भीमा कोरेगाव घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान हदगाव तालुक्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर मात्र नांदेडमध्ये फिरकले नाहीत. विशेष म्हणजे ते गुरुवारी नांदेडमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार हा आंदोलन, धरणे, मोर्चाचा दिवस ठरला. या काळातच अनेक ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांचा अतिरेकी बळाचा फटका सामान्य नागरिकांना बसला.पोलिसांविरुद्ध तीव्र असंतोष बुधवारी सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत उफाळून आला. जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती हताळण्यात प्रशासन विशेषत: पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतरही पालकमंत्री खोतकर यांनी मात्र नांदेडकडे पाठ फिरविली. नांदेड महापालिका आणि किनवट नगरपालिका निकालामध्ये शिवसेनेचा सफाया झाल्यापासून ते केवळ नियोजन समितीच्या बैठकीसाठी नांदेडमध्ये आले होते.