शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्याने वीज खंडावर मात करत असा केला मोटार पंप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 12:10 IST

देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़

- युनूसमियाँ नदाफ (पार्डी, नांदेड)

अर्धापूर तालुक्यात विहीर व बोअरवेल प्रमुख स्रोत असून इसापूर धरण्याच्या पाण्यावर तालुक्यातील बहुतांशी शेती सिंचनावर आहे़ इसापूर धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध झाल्यावर विहीर व बोअरवेल याची सुद्धा पाणीपातळीत झपाट्याने वाढ होते़ परंतु मागील काही वर्षांपासून शेतीसाठी मिळणारा वीज पुरवठा कमी झाल्याने पिके वाळून जात आहेत़ तासनतास विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने बागायती शेती वाळून जात आहेत़

रोहित्र ना दुरुस्त झाल्यावर एक-एक महिना याकडे कोणी लक्ष देत नसल्याने शेतीचे नुकसान होत आहे़ यामुळे तालुक्यातील देळूब ( बु ) येथील शेतकरी नूरखान पठाण यांनी यंत्राच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याचा प्रयोग तीन वर्षांपासून करत असून तो यशस्वी झाला आहे़ त्यांच्याकडे वडिलोपार्जित ५० एकर जमीन असून प्रमुख पीक म्हणून  काबुली चना व सोयाबीन असे पीक घेतात़ काबुली चना साठी सिंचनाचा स्रोत विहिरी आहेत़ परंतु वीज पुरवठा खंडित होत असल्याने त्यांनी ट्रॅक्टरवर वीज निर्मिती करून मोटार पंप सुरू केले आहे़ 

ट्रॅक्टरला डाइनोमा जोडून वीज निर्मिती करण्यात आली आहे़  ती वीज मोटार पंपाला जोडली गेली असून या विजेपासून तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात आली आहे़ या  डाइनोमाची क्षमता जास्त प्रमाणात असल्याने  तीन ते चार मोटार पंप एकाच वेळेस चालू असतात़  यासाठी सहा किटक्याट जोडावे लागते़ कारण  इन पुट, आउट पुट असते़ तीन किटक्याट मध्ये  वीज निर्मितीसाठी असतात़  तर दुसऱ्या तीन किटक्याटमधून मोटार पंपास वीज जोडणी करावी लागते़  या यंत्राच्या सहाय्याने तीन ते चार मोटार पंप सुरू करण्यात येते़ या यंत्रामुळे वीज पुरवठा खंडित झाला़ तरी शेतीसाठी पाणी देण्यासाठी या यंत्राचा वापर होतो.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी