शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात भुश्याची पोती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:46 IST

कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अ‍ॅग्रोच्या गोदामातील पोत्यांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये भुस्सा भरलेली अनेक पोती असल्याचे आतापर्यंतच्या तपासणीत आढळून आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे़

ठळक मुद्देधान्य घोटाळा : तीन दिवसांपासून धान्याची मोजदाद सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या गोदामात शासकीय वितरण व्यवस्थेतील गव्हाची सहा हजार पोती असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे़ या प्रकरणात गेल्या तीन दिवसांपासून जप्त केलेल्या धान्याची मोजदाद सुरु असताना बुधवारी मेगा अ‍ॅग्रोच्या गोदामातील पोत्यांची तपासणी करण्यात आली़ त्यामध्ये भुस्सा भरलेली अनेक पोती असल्याचे आतापर्यंतच्या तपासणीत आढळून आले आहे़ त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळत आहे़मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीवरील छाप्याला महिना उलटल्यानंतर पोलिसांनी आपल्याकडील जप्त धान्याचे ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले़ पुरवठा विभागाने या धान्याची मोजदाद करण्यासाठी सहा अधिकाऱ्यांचे पथक नेमले आहे़ त्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांचाही समोवश आहे़ पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उभे असलेले हे ट्रक खुपसरवाडी येथील शासकीय धान्य गोदामात नेण्यात आले़ या ठिकाणी या धान्याची मोजदाद सुरु आहे़ गेल्या तीन दिवसांपासून ही मोजदाद सुरु असून त्यामध्ये लाखो रुपयांच्या या धान्याला कोंब फुटल्याचे आढळून आले़ त्यानंतर बुधवारी हे पथक कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत गेले़ या ठिकाणी पोत्यांची तपासणी सुरु असून आतापर्यंत धान्यापेक्षा भुस्सा भरलेलीच अधिक पोती येथे आढळली़ तपासणी पथकाला प्रत्येक पोते उघडून त्यात धान्य की भुस्सा याची तपासणी करावी लागत आहे़ तसेच त्याचे वजनही केले जात आहे़ अद्यापही मोजणी पूर्ण झाली नसून पोलिसांच्या दाव्याप्रमाणे या ठिकाणची पोती सहा हजार की त्यापेक्षा कमी? हे मोजणी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे़पारसेवारच्या जामिनावर आज सुनावणीबिलोली न्यायालयात धान्य वाहतुकीचा कंत्राटदार राजू पारसेवार याच्या अटकपूर्व जामिनावर बचाव आणि सरकार पक्षाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत़ सोमवारी बचाव पक्षाने तर बुधवारी सरकार पक्षाने युक्तिवाद केला़ न्या़एस़व्ही़ कतरे यांच्यासमोर सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़दिलीप बोमनाळीकर यांनी बाजू मांडली़ दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणात आता गुरुवारी निर्णय होणार आहे़

टॅग्स :Nandedनांदेडfraudधोकेबाजी