शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

ग्रामसेवक वडजे रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:22 IST

रायभोगे यांनी स्वीकारला पदभार भोकर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या भोकरचे कार्यकारी अभियंता म्हणून प्रकाश रायभोगे यांनी पदभार स्वीकारला. ...

रायभोगे यांनी स्वीकारला पदभार

भोकर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या भोकरचे कार्यकारी अभियंता म्हणून प्रकाश रायभोगे यांनी पदभार स्वीकारला. कार्यालयात एकूण १७ कर्मचारी आहेत. हे कार्यालय नव्याने सुरू करण्यात आले. रायभोेगे यांनी पदभार स्वीकारताना शाखा अभियंता चव्हाण, कुलकर्णी, नाना उमरीकर उपस्थित होते.

कुंडलवाडीत वृक्षारोपण

कुंडलवाडी : येथील माचनूर रोडलगत असलेल्या दलित वस्ती स्मशानभूमीत २०० रोपांचे वृक्षारोपण नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार, मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी नगरसेवक शेख मुख्त्यार, व्यंकट गिरामे, कर्मचारी सुभाष निरावार, गंगाधर पत्की, हेमचंद्र वाघमारे, राम पिचकेवार, मोहन कंपले आदी उपस्थित होते.

उमरीत वृक्षारोपण

उमरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उमरी नगरपरिषदेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षांचे प्रतिनिधी सदानंदराव खांडरे, उपनगराध्यक्ष महंमद रफीक, गटनेता प्रवीण सारडा, नगरसेविका अनुसयाबाई कटकदवणे, नगरसेवक साईनाथ जमदाडे, शंकरराव पाटील, रतन खंदारे, नंदकिशोर डहाळे, अशोकराव मामीडवार, सोनू वाघमारे आदी उपस्थित होते.

उपसभापतींची आज निवड

देगलूर : येथील पंचायत समितीच्या नव्या उपसभापतींची निवड उद्या मंगळवारी होणार आहे. यापूर्वीच्या उपसभापती ज्योती चिंतलवार यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात येत आहे. पीठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी शक्ती कदम राहणार आहेत.

पर्यावरण दिन साजरा

मांडवी : पर्यावरण दिनानिमित्त मांडवीत वनपरीक्षेत्रांतर्गत जवरला येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध २०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी वनविभागाचे उपवनसंरक्षक एम.आर. शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, ॲड.माधवराव मरस्कोल्हे, सरपंच भूपेंद्र आडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी वनपाल माने, मीरा गायकवाड, वनरक्षक रायमल्ले, गमे पाटील, माधव डाके यांनी परिश्रम घेतले.

शिवस्वराज्य दिन साजरा

नायगाव : घुंगराळा येथे शिवस्वराज्य दिन सरपंच राधाबाई जोगेवार यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी उपसरपंच वसंत सुगावे पाटील, ग्रामसेवक कदम सदस्य गोविंदराव पांचाळ, गंगाधर सूर्यवंशी, लक्ष्मीबाई ढगे, गयाबाई ढगे, रंजना कंचलवार, बालाजी मातावाड आदी उपस्थित होते.

सोमठाण्यात वृक्ष लागवड

भोकर : तालुका आरोग्य अधिकारी राहुल वाघमारे यांच्या उपस्थितीत सोमठाणा आरोग्य उपकेंद्र, मातूळ आरोग्य उपकेंद्र व परिसरातील उपकेंद्रावर वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.एस. डाकोरे, सरपंच, उपसरपंच, आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांची घेतली भेट

कुंडलवाडी : शहरातील विविध विकास कामांसाठी नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी मुंबई मुक्कामी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी नरेंद्र जिठ्ठावार, उपाध्यक्ष शैलेष ऱ्याकावार, नगरसेवक सचिन कोटलवार, बिलोलीचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, मिलिंद पाडाळकर यांनी चव्हाण यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

लखमावाड सेवानिवृत्त

बिलोली : तालुका पर्यवेक्षक रामलू लखमावाड सेवानिवृत्त झाल्याने तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड यांचा कार्यकाळ एक वर्ष वाढल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास बिलोलीचे डॉ.गणपत वाडेकर, देगलूरचे डॉ.आकाश देशमुख, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.नागेश लखमावार, डॉ.विनोद माहुरे, डॉ.नरेश बोधनकर, डॉ.बोरसे, तालुका पर्यवेक्षक कटके उपस्थित होते.

उपाध्यक्षनदी नवीन राठोड

मांडवी : ओबीसी सेलचे प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नवीन राठोड यांची आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीचे अनेकांनी स्वागत केले आहे.

शेतकऱ्यांना बियाणे वाटप

अर्धापूर : शिवगंगा दूध डेअरी व भाजयुमोच्या वतीने ५ जून रोजी शेतकऱ्यांना बी-बियाणे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, जठन पाटील, उपजिल्हाध्यक्ष बाबुराव लंगडे, विराज देशमुख, सखाराम क्षीरसागर, नगरसेवक तुकाराम साखरे, शिवराज जाधव, शहराध्यक्ष विलास साबळे उपस्थित होते. आयोजन योगेश हाळदे, तुकाराम माटे यांनी केले.