शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

धान्य घोटाळ्यातील जप्त धान्याची संयुक्त मोजदाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 00:50 IST

कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहेत. या ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्याचे काम २७ आॅगस्ट रोजी सुरु झाले होते. त्याचवेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली असून २८ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देमेगा अ‍ॅग्रोमधून जप्त केलेले धान्य पुरवठा विभागाच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कृष्णूर येथील मेगा इंडिया अ‍ॅग्रो अनाज कंपनीच्या छाप्यात जप्त केलेले ट्रक नेमके कुठे आहेत, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे खुलासा मागितल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणात जप्त करण्यात आलेले धान्याचे दहा ट्रक पुरवठा विभागाच्या ताब्यात दिले आहेत. या ट्रकमधील धान्याची मोजदाद करण्याचे काम २७ आॅगस्ट रोजी सुरु झाले होते. त्याचवेळी उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली असून २८ आॅगस्टपर्यंत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत पोलिसांनी पुरवठा विभागाचे धान्य असलेले दहा ट्रक जप्त केले होते. यातील तीन ट्रक नांदेड जिल्ह्यातले तर सात ट्रक हिंगोली जिल्ह्यातील होते. पोलिसांनी नांदेड जिल्ह्यातील तीन ट्रकच्या धान्याच्या तपासात तीन वर्षांचे रेकॉर्ड पुरवठा विभागाकडे मागितले होते. त्याचवेळी अन्य तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी तपास केला. मात्र त्याचवेळी जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये महसूल विभागाला या प्रकरणाची माहिती देणे आवश्यक असताना पोलिसांनी कोणतीही माहिती दिली नाही. याबाबत प्रारंभी पुरवठा अधिकाºयांनी पोलिसांना पत्र दिले. त्या पत्रावरही पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी २१ आॅगस्ट रोजी तपास करणाºया सहायक पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांना पत्र पाठवित १ आॅगस्ट रोजी कृष्णूर येथे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी हे गेले असता त्या ठिकाणी कारवाई केलेले कोणतेही ट्रक नसल्याचे नमूद केले. त्यामुळे हे ट्रक नेमके आहेत कुठे याबाबत खुलासा करावा, अशी सूचना केली होती. पोलिसांनी जप्त केलेले गोदामातील धान्य आणि ट्रकमधील धान्य याबाबतही माहिती विचारली होती. हे पत्र मिळताच पोलिसांनी कृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीत धाड टाकलेले दहा ट्रक सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस मुख्यालयात ठेवल्याचे स्पष्टीकरण दिले. तसेच हे ट्रक महसूल विभागाच्या ताब्यात दिले आहेत. त्यानंतर सदर ट्रक शासकीय गोदामात नेले असून धान्याची मोजदाद केली जात आहे. हे धान्य खाण्यायोग्य राहिले की नाही, याबाबत तपासणी केली जाणार आहे.पारसेवारच्या जामिनावर बुधवारी निर्णयकृष्णूरच्या मेगा अ‍ॅग्रो अनाज कंपनीतील धान्य घोटाळा प्रकरणात शासकीय धान्याची वाहतूक करण्याचे कंत्राट असलेल्या राजू पारसेवार याच्या अटकपूर्व जामिनावर सोमवारी बिलोली येथील सत्र न्यायालयात बचाव पक्षाचा युक्तिवाद झाला़ सरकार पक्षाच्या वतीने बुधवारी आपली बाजू मांडण्यात येणार असून त्यानंतरच पारसेवारच्या जामिनाबाबत निर्णय होणार आहे़बिलोली सत्र न्यायालयाचे न्या़ एस़ बी़ कत्रे यांच्यासमोर हा युक्तिवाद झाला़ यावेळी बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ व्ही़ एम़ देशमुख यांनी पारसेवार यांची बाजू मांडताना जिल्हाधिकाºयांच्या अहवालातील अनेक मुद्यांचा उल्लेख केला़ पोलिसांनी पकडलेल्या दहा ट्रकपैकी फक्त तीन ट्रकचा संबंध असल्याचे सांगत ते नायगाव, मुक्रमाबाद आणि कुंडलवाडी या नियोजित मार्गावरच जात असल्याचे नमूद करण्यात आले़ सुनावणीच्या वेळी न्यायालयात तपास अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन हे उपस्थित होते़ सोमवारी बचाव पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर सरकार पक्षाच्या वतीने आता बुधवारी युक्तिवाद करण्यात येणार आहे़ त्यानंतरच पारसेवार यांच्या जामिनाबाबत निर्णय होणार आहे़सहा सदस्यीय चौकशी पथकजीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये महसूल विभागाने या प्रकरणात कारवाई सुरु केली आहे. जिल्हाधिकाºयांनी नांदेडचे उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. यात तहसीलदार सुरेश घोळवे, नायब तहसीलदार विजय चव्हाण, राम बोरगावकर या महसूल अधिकाºयांसह स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस निरीक्षकांचाही समावेश आहे. या चौकशी पथकाने धाडीत जप्त केलेल्या धान्याची मोजणी सुरु केली होती. उद्या मंगळवारी मोजणी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Nandedनांदेडfoodअन्नNanded policeनांदेड पोलीसNanded S Pपोलीस अधीक्षक, नांदेडfraudधोकेबाजी