शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

गोदावरीची प्रदूषणमुक्तीकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:16 IST

शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.

ठळक मुद्देमहापालिका : गोदावरी नदीत मिसळणारे शहरातील १७ नाले कायमस्वरूपी बंद, नवा प्रस्तावही शासनाकडे सादर

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराजवळून वाहणाऱ्या गोदावरी नदीची झालेली अवस्था पाहता भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असतानाच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आल्यानंतर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हा दाखल करुन कदम यांनी गोदावरी नदीप्रति आपली भावना स्पष्ट केली होती.दक्षिण भारतातील काशी समजल्या जाणाºया नांदेडला गोदावरी नदीमुळे हे महत्त्व प्राप्त झाले आहे. भावनिकदृष्ट्या आजही गोदामातेचे स्थान भाविकांच्या मनात कायमच आहे; पण गोदावरी नदीची अनेक दिवसांपासून दुरवस्था झाली होती. शहरातील १८ नाले थेट गोदापात्रात मिसळत होते. परिणामी गोदामातेचे पावित्र्य पूर्णत: लोप पावले होते.देशभरातून नांदेडला येणारे शीख भाविक आणि दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखले जाणारे नांदेड शहर व या ओळखीतून येणारे देशभरातील भाविक गोदावरीची अवस्था पाहून तीव्र संताप व्यक्त करीत होते. सामाजिक संस्थाही गोदावरीच्या या नदीकडे दुर्लक्षच करीत होते. केवळ ्रकागदोपत्री तक्रारी, निवेदने दिले जात होते. अशातच पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. या दौºयात त्यांनी गोदावरी काठाची पाहणी केली. ९ जून २०१७ रोजी केलेल्या या दौºयात गोदावरीची अवस्था पाहून पर्यावरणमंत्री कदम यांनी तत्कालीन अधिकाºयांना चांगलेच खडसावले होते. इतकेच नव्हे तर त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांना गोदावरी नदीच्या पाण्याचे नमुने घेवून तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तत्कालीन महापौर आणि आयुक्तांविरुद्ध गुन्हेही दाखल केले होते. त्या कारवाईनंतर महापालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाच्या हालचालींना प्रारंभ केला.त्यातच पालकमंत्रीपदाचा पदभारही पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडेच आला. त्यांनी गोदावरी नदीच्या शुद्धीकरणास प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले होते.महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणाची मोहीम उघडताना प्रारंभी गोदावरी नदीत थेट मिसळणारे शहरातील १७ नाले बंद केले. गोदावरी काठावरुनच चार किलोमीटर अंतराची स्वतंत्र ड्रेनेजलाईन टाकली. चुनाल नाला उर्वशी घाट ते जुना पुलापर्यंत ६०० एम.एम. ते १ हजार एम.एम. व्यासाची पाईपलाईन टाकून गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले या पाईपलाईनला जोडले. परिणामी आज घडीला गोदावरी नदीत मिसळणारे १७ नाले पूर्णत: बंद झाले आहेत. त्यामुळे पाणी गोदावरीत जाणे थांबले आहे.गोवर्धनघाट, बंदाघाट, नगिनाघाट, गायत्री मंदिर, शनि मंदिर, बालाजी नाला, गाडीपुरा नाला, बडी दर्गाह नाला, नावघाट नाल्यातून वाहणारे पाणी आता थेट देगलूर नाका पंपींग स्टेशनपर्यंत पोहोचविले जात आहे. हे पाणी पंपींग स्टेशनहून बोंढार जलशुद्धीकरण प्रकल्पात पाठविले जाते.एकूणच गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी आता महापालिकेने आता कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीचा प्रकल्प तयार करण्यात आला होता. जवळपास २२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या मान्यतेनंतर गोदावरी नदी निश्चितच प्रदूषणमुक्त होईल, असे पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे म्हणाले.गोदावरी शुद्धीकरणासाठी २२ कोटींचा प्रस्तावगोदावरी शुद्धीकरणाचे हे प्रयत्न सुरू ठेवतानाच महापालिकेने नव्याने २२ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या नव्या प्रकल्पात शहरातील उर्वशी घाटावर ६ एमएलडी क्षमतेचे नवीन जल शुद्धीकरण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच बडी दर्गाह ते देगलूरनाका दरम्यान मोठा उघडा नाला प्रस्तावित आहे.या नाल्याचे अंतर २ कि.मी. राहणार आहे. पावसाळ्यातील पाण्याचे प्रमाण जास्त असते. परिणामी हे पाणी पाईपलाईनमधून पूर्णपणे वाहणे शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा २ कि.मी.चा उघडा नाला प्रस्तावित केल्याचे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

 

सामाजिक संस्थांच्या पुढाकाराची गरजगोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महापालिकेने प्रशासकीय स्तरावर उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्या योजनांचा आता परिणामही पुढे येत आहे. गोदावरी नदीत मिसळणारे थेट नाले बंद झाले आहेत. त्यामुळे आता गोवर्धनघाटापासून गायत्री मंदिर बालाजी नालापर्यंतचा घाट निश्चितच मोकळा झाला आहे. त्याच्यापुढे नावघाटपर्यंतच्या भागातून गोदावरीत मिसळणारे नाले थांबविण्यात आले आहेत. महापालिकेकडून सध्या स्वच्छता मोहीम राबविली जात असली तरी ती कायमस्वरुपी असणार नाही. या घाटावर आता सामाजिक संस्थांनी स्वच्छता मोहीम राबविल्यास हा परिसर सुंदर होईल तसेच वापरातही येणार आहे.

टॅग्स :godavariगोदावरीwater pollutionजल प्रदूषणriverनदी