शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गोदा शुद्धीकरण; एसटीपीसाठी २० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:21 IST

शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळू नये यासाठी महापालिका आता प्रयत्न करीत असून यासाठी शासनदरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून २० कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत.

ठळक मुद्देराज्य शासनाने दिली मनपाच्या प्रस्तावाला मान्यता

नांदेड : शहरातील नाल्यांचे पाणी गोदावरी नदीत मिसळू नये यासाठी महापालिका आता प्रयत्न करीत असून यासाठी शासनदरबारी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून २० कोटी रुपये लवकरच प्राप्त होणार आहेत. जवळपास ४० कोटी रुपयांचा हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून गोदावरी नदीचे पावित्र्य लोप पावल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षांपासून गोदावरी शुद्धीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.महापालिकेने गोदावरी शुद्धीकरणासाठी चुनालनाला आणि शनिमंदिर परिसरात मलशुद्धीकरण केंद्र निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात अनेक अडथळे येत होते. हे अडथळे आता दूर झाले आहेत. प्रारंभी सुधारित आराखडा पाठविण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने सुधारित प्रस्ताव पाठवला. हा प्रस्ताव जवळपास ४० कोटींचा होता. चुनालनाला व शनिमंदिर परिसर येथे मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव होता. या ठिकाणी शहरातून वाहणाºया नाल्यांचे पाणी गोदावरीत न मिसळता या पाण्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.पालकमंत्री रामदास कदम यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पर्यावरण विभागामार्फत हा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ४० कोटींच्या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून २० कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महापालिकेने या कामाला सुरुवात केल्यानंतर गोदावरी शुद्धीकरणाचा विषय मार्गी लागणार आहे.दरम्यान, गोदावरी नदीत मिळसणारे १९ नाले जलवाहिनीद्वारे देगलूर नाका येथील पंपगृहापर्यंत आणण्यात आले होते. तेथून ते पाणी बोंढार येथील मलशुद्धीकरण केंद्रात सोडण्यात आले. २००८ ते २०१७ पर्यंत ही योजना बंद पडली होती. तब्बल १३ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. बंद पडलेल्या या योजनेवर ५५ लाख रुपये खर्च करत महापालिकेने देगलूर नाका येथे पंपगृह सुरू केला. या योजनेअंतर्गत चुनाल नाला ते जुन्या पुलापर्यंत ६०० ते १००० एमएम व्यासाची जलवाहिनी टाकून शहरातील नाल्याचे पाणी देगलूरनाका येथील पंपगृहापर्यंत नेण्यात आले. काही दिवस ही योजना सुरळीत चाललीही. मात्र पुन्हा ‘जैसे थे’ पाढे सुरू झाले.आजघडीला गोदावरी दुष्काळामुळे पूर्णत: कोरडी पडली आहे. काही दिवसांपूर्वी जलपर्णीचे मोठे संकट आले होते. हे संकट कायम असले तरीही पाण्याअभावी गोदावरी कोरडी पडली आहे. मनपा प्रशासनाने गोदावरी शुद्धीकरणासाठी तसेच जलपर्णी काढण्यासाठी सामाजिक संघटनांची मदत घेतली होती. तसेच पर्यावरणतज्ज्ञांची मतेही जाणून घेतली होती. त्यावर कामही सुरू झाले आहे. त्यात चुनालनाला व शनिमंदिर परिसरात मलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची सूचना करण्यात आली होती.एमआयडीसी, रेल्वे विभागाला पाणीचुनालनाला आणि शनीमंदिर परिसरात होणा-या मलशुद्धीकरण केंद्रातून प्रक्रिया केलेले पाणी एमआयडीसी आणि रेल्वे विभागाला देण्याबाबत विचार सुरू आहे. परिणामी विष्णूपुरी प्रकल्पातून या दोन्ही विभागांना दिल्या जाणा-या पाण्याची बचत होणार आहे.या दोन मलशुद्धीकरण केंद्राच्या निर्मितीमुळे शहरातून वाहणारे मुख्य नाल्यांचे पाणी आता नदीमध्ये मिसळणार नाही. देगलूरनाका येथेही एक मलशुद्धीकरण केंद्र आहे. या तीन केंद्रामुळे गोदावरीत नाल्यांचे जाणारे पाणी निश्चितपणे थांबेल, असा विश्वास आयुक्त लहुराज माळी यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडgodavariगोदावरीState Governmentराज्य सरकारBudgetअर्थसंकल्प