शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
2
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
3
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
4
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
5
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
6
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
7
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
8
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
9
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
10
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
11
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
12
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
13
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
14
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
15
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
16
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
17
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
18
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
19
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
20
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

‘जय श्रीराम’ चा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 00:31 IST

प्रभू श्रीरामांची सुमधुर भजने, भगवे फेटे घातलेली सळसळत्या रक्ताची तरुणाई, पारंपरिक वेषभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अन् जोडीला देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या सैनिकांना समर्पित देखावे यासह निघालेल्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत प्रभू जय श्रीरामांच्या जयघोषाने नांदेड नगरी दुमदुमली होती़

ठळक मुद्देश्रीराम जन्मोत्सव हजारो रामभक्तांचा शोभायात्रेत सहभाग

नांदेड : प्रभू श्रीरामांची सुमधुर भजने, भगवे फेटे घातलेली सळसळत्या रक्ताची तरुणाई, पारंपरिक वेषभूषेतील महिलांचा उत्स्फूर्त सहभाग अन् जोडीला देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या सैनिकांना समर्पित देखावे यासह निघालेल्या श्रीराम नवमीच्या शोभायात्रेत प्रभू जय श्रीरामांच्या जयघोषाने नांदेड नगरी दुमदुमली होती़दुपारी १ वाजता गाडीपुरा येथील मंदिरात महाआरती केल्यानंतर जन्मोत्सवाच्या शोभायात्रेला सुरुवात झाली़ एका वाहनावर ठेवलेली प्रभू श्रीरामांची आकर्षक मूर्ती लक्ष वेधून घेत होती़ त्यासमोर ढोलपथक, महापुरुषांच्या झाकी, भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करुन देणारे सैनिकांना समर्पित देखावे, पालखी, राम मंदिराची प्रतिकृती, भजनी मंडळ यांचा शोभायात्रेत समावेश होता़ त्याच्यामागेच स्वच्छतेसाठी स्वयंसेवकांची मोठी फळी कार्यरत होती़ ढोलपथकांच्या तालावर यावेळी तरुणाईने ठेका धरला होता़ त्याचबरोबर साऊंड सिस्टीमवरुन सुरु असलेल्या भजनांना टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद देण्यात येत होता़शोभायात्रा दुपारी जुना मोंढा टॉवरजवळ आली़ या ठिकाणी ढोलपथकाने आपल्या कलेचे सादरीकरण केले़ सायंकाळी पावणे सात वाजता ही शोभायात्रा वजिराबाद चौकात आली होती़ त्यानंतर शिवाजीनगर भागात येण्यासाठी रात्रीचे साडेआठ वाजले़ शोभायात्रेचे एक टोक शिवाजीनगर ओव्हरब्रीजवर तर दुसरे टोक पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत होते़ यावरुन शोभायात्रेतील गर्दीचा अंदाज येईल़ शिवाजीनगर भागात इमारतीवर उभे राहून नागरिकांनी शोभायात्रा डोळ्यात साठविली़ यावेळी अनेकांनी छतावरुन शोभायात्रेवर पुष्प उधळले़ यावेळी तरुणाईने गाण्यांवर ठेका धरला होता़ रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील मंदिरात आरती करुन शोभायात्रेचा समारोप करण्यात आला़ यावेळी स्वच्छता पथकाने रस्त्यावरील कचरा उचलला़देखाव्यांनी वेधले लक्षशोभायात्रेत हनुमानाच्या वेषभूषेत अनेक चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता़ ते जय श्रीरामच्या घोषणा देत होते़ त्याचबरोबर सैनिकांची समर्पित ब्राम्होस, अग्नी या क्षेपणास्त्रांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या होत्या़ सैनिकी वेषात असलेले तरुण भारत माता की जय, जय श्री रामच्या घोषणा देत होते़ शोभायात्रेतील या विविध देखाव्यांनी नांदेडकरांचे लक्ष वेधून घेतले होते़

टॅग्स :NandedनांदेडRam Navamiराम नवमीReligious programmeधार्मिक कार्यक्रम