शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतात राबणारी ‘ती’ आता होणार डॉक्टर! ज्योती कंधारेची प्रेरणादायी कथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2023 12:30 IST

क्लास न लावता घरीच ज्योतीने केला नीटचा अभ्यास

मधुकर डांगे, लोकमत न्यूज नेटवर्क, फुलवळ (जि. नांदेड): कंधार तालुक्यातील फुलवळपासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या कंधारेवाडी येथील अंकुश काशिनाथ कंधारे या अल्प भूधारक शेतकऱ्याची कन्या ज्योती  कंधारे हिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसभर शेतात काम करून रात्री चार पाच तास नीट परीक्षेचा अभ्यास करत  नीट परीक्षेत ७२० पैकी ५६३ गुण घेऊन देशात ५३६२५ वा क्रमांक मिळवला. डॉक्टर होण्याची पहिली पायरी तिने चांगल्या गुणांनी पार केली असून ती गावातली पहिली डॉक्टर ठरणार आहे.

ज्योतीने दहावीपर्यंतचे शिक्षण कंधार येथील महात्मा फुले विद्यालयात घेतले. दहावीला तिला ९० टक्के मिळाले. ११  वी १२ तिने कंधारेवाडी येथीलच विद्यासागर व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत केली. घरीच अभ्यास केला. शिवाय आईवडिलांना शेतीकामात मदत करायची. बाहेरून कॉलेज करीत बारावीच्या परीक्षेत तिने ६८ टक्के गुण घेतले. कंधारे यांच्या कुटुंबात अद्यापपर्यंत कुणीही शासकीय नोकरीला नाही व अंकुश कंधारे यांचे शिक्षण ११ वीपर्यंतच झाले. पुढे त्यांची शिकण्याची इच्छा होती; पण परिस्थिती बिकट असल्यामुळे पुढील शिक्षण घेऊ शकले नाहीत. त्यांचा मुलगा अर्थात ज्योतीचा भाऊ हा  दहावीनंतर आयटीआय करून एका कंपनीत दहा हजार पगारावर काम करतोय.

क्लास न लावता घरीच ज्योतीने  नीटचा अभ्यास केला आणि पहिल्याच प्रयत्नात तिने चांगले गुण घेतले. वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी ती आता पात्र ठरली आहे.

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी