शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

गॅस सिलिंडरची आठ महिन्यांत २९३ रुपयांची दरवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:55 AM

गेल्या आठ महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची वाढ झाली असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले़ त्यातच अनुदान घेणाऱ्या ग्राहकांचे अनुदानही बँक खात्यात जमा होत नसल्याने ‘अच्छे दिन’चे स्वप्न पाहणाºयांचा हिरमोड झाला आहे़ गेल्या आठ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या दरांचा आढावा घेत गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल २९३ रुपयांची घवघशीत वाढ झाल्याने नोव्हेंबर महिन्यात अनुदानित सिलिंडर ४.९५ रुपयांनी तर विनाअनुदानित सिलिंडर २९३ रुपयांनी महागले आहे़ आता विनाअनुदानित सिलिंडरसाठी ९९३ रूपये मोजावे लागत आहेत.

ठळक मुद्दे महागाईचा भडकास्वयंपाकघराचे गणित कोलमडले

नितेश बनसोडे ।श्रीक्षेत्र माहूर : दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने विनाअनुदानित सिलिंडरवर कंबरमोड भाववाढ करून जनतेला दिवाळीत महागाईची गिफ्ट दिली. घरगुती वापराचा गॅस सिलिंडर आता ५१४.५८ रूपयाला पडत आहे. अनेक ग्राहकांनी सबसिडी सोडत असल्याचे मेसेज केलेले नाहीत़ असे असतानाही सबसिडी त्याच्या बँक खात्यात जमा होत नसल्याने ते पण विनाअनुदानितच्याच यादीत जाऊन बसले आहेत़ अनुदान न सोडणाºयांसह अनुदान सोडणाºया ग्राहकांना आता गॅस सिलिंडर सरसकट ९९३ ला पडत आहे. आठ महिन्यांत गॅस सिलिंडर २९३ रुपयाने महाग झालेले दिसून येत असून या दरवाढीने ग्राहकांतून कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे.आणखी दरवाढीची शक्यताविना अनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत सातत्याने होणाºया दरवाढीविरुद्ध विरोधी पक्षातर्फे केवळ नामधारी आंदोलन उभारले जात आहे़ नागरिकांना मात्र ‘सगळा गाव मामाचा अन् एकही नाही कामाचा’ चीच प्रचिती येत आहे.डिसेंबरमध्ये एक हजारच्या पलीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढाल लक्षात घेता येत्या डिसेंबर महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे भाव एक हजारच्या वर जाणार असल्याचे संकेत आहेत.डीलरचे कमिशन वाढविण्यासाठी केंद्राने नोव्हेंबरमध्ये दोनदा गॅस सिलिंडरच्या भावात वाढ केली आहे १ नोव्हेंबर रोजी २.९४ पैशांनी वाढ करून २ नोव्हेंबर रोजी डीलर्सचे कमिशन वाढविले़ हा भार सर्वसामान्य ग्राहकांच्या माथी मारून हे सरकार सर्वसामान्यांच्या नव्हे, तर भांडवलदारांच्या हितासाठी काम करत असल्याचे सिद्ध होत असल्याच्या प्रतिक्रिया ग्राहकांतून व्यक्त होत आहेत.आधी पैसा खर्चआंतरराष्ट्रीय बाजारानुसार देशांतर्गत गॅस सिलिंडरची दरवाढ निश्चित होत असते़ सातत्याने होत असलेल्या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शासनाकडून मिळणारे अनुदान उशिराने बँक खात्यात येत असून लोकांच्या खिशातून आधी पैसा खर्च होतो. त्यानंतरही पैसे मिळत नाहीत़टाळाटाळयाशिवाय अनेक ग्राहकांनी गॅस सिलिंडरचे अनुदान सोडत असल्याचे संदेश केलेले नसतानाही सुरुवातीला नियमितपणे बँक खात्यात जमा होत असलेले अनुदान सुद्धा अनेक ग्राहकांना मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. ग्राहक याबाबत गॅस एजन्सीकडे विचारले असता ते बँकेत जाऊन विचारा, असे सांगत आहेत.महागाईचा आलेखसत्ताधारी पक्षाचे गल्लीतील कार्यकर्ते मात्र उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून घराघरांत गॅस सिलिंडर पोहोचले असल्याच्या टिमक्या मारत आहेत़ मात्र दरवाढीचा हा आलेख दिवसेंदिवस वाढतच असल्याने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे.

टॅग्स :NandedनांदेडCylinderगॅस सिलेंडरGovernmentसरकार