शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

गाडगेबाबा जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:22 IST

देगलूरला चाैकाचे अनावरण देगलूर - येथील महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नाव देण्यात आले. ...

देगलूरला चाैकाचे अनावरण

देगलूर - येथील महाविद्यालयासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या चौकास संत सेवालाल महाराज चौक असे नाव देण्यात आले. चौकाचे अनावरण समाजकल्याण सभापती ॲड.रामराव नाईक यांच्या हस्ते झाले. यावेळी विशाल पवार यांनी आभार मानले. यावेळी धोंडीबा राठोड, बालाजी जाधव, नाळू पवार, राजू पवार, रमेश राठोड, रमेश चव्हाण, नंदू राठोड, दत्ता पवार आदी उपस्थित होते.

बेल्ट प्रमाणपत्र वितरण

नायगाव - येथील ग्रीन व्हॅली स्कूलमध्ये आयोजित बेल्ट आणि प्रमाणपत्र वितरण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी राजेंद्रकुमार बैस व क्षीतिजा बैस यांनी ब्लॅक बेल्ट पदवी मिळविली. कार्यक्रमात कुमुद पटेल, किशोर पांचाळ, स्वप्नील पांचाळ, पांडे, नागठाणे उपस्थित होते.

गाडगे महाराज जयंती

अर्धापूर - अर्धापूर तालुक्यात ठिकठिकाणी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. शहरातील सखाराम लंगडे नगरात आयोजित कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक मुंजाजीराव लंगडे, राम पाटील, सचिन काळे, संतोष कऱ्हाळे, सखाराम क्षीरसागर, गुणवंत विरकर, उद्धव सरोदे, मुकींदा मोहिते, गजानन मुधळे, मारोती मुधळे आदी उपस्थित होते.

नुकसानीची भीती

देगलूर - वातावरणातील बदल आणि पडलेल्या अवकाळी पावसामुळे रबी पिकांचे मोठे नुकसान होणार आहे. यासह आंबा, द्राक्ष, कांदा, लसूण, टरबुज, खरबुज आदींचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. येत्या काही दिवसात पुन्हा पाऊस पडला तर काढणीला आलेला हरभराही वाया जाणार आहे.

रेणुकामाता मंदिर सुरू

माहूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहूर गडावरील दत्तमंदिर बंद करण्यात आले असले तरी रेणुकामाता मंदिर मात्र सुरू आहे अशी माहिती व्यवस्थापक जयंत देशमुख यांनी दिली. त्यामुळे मातेचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची चांगलीच सोय झाली आहे.

कुंडलवाडीत एक पॉझीटिव्ह

कुंडलवाडी - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी १४ जणांची रॅपीड ॲंटीजन टेस्ट करण्यात आली. त्यात एक जण पॉझीटिव्ह आढळला. नागरिकांनी सोशल डीस्टंस ठेवणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहुरे यांनी केले आहे.

गाडगे महाराज जयंती

लोहा - तालुक्यातील कापसी बु. येथे संत गाडगे महाराज जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला सरपंच ललिता आळणे, सदस्य नागेश पाटील, केशव वडवळे, संतोष वडवळे, मोहन टोम्पे, शिवाजी देवदे, संजय वडवळे, व्यंकटेश शिरसाठ, शिवाजी आळणे आदी उपस्थित होते.

विकासकामांचे भूमिपूजन

कंधार - तालुक्यातील वंजारवाडी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आ.श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते झाले. बिनविरोध निघणाऱ्या ग्रामपंचायतीला पाच लाखांचे बक्षीस शिंदे यांनी जाहीर केले होते. वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्याने पाच लाखांच्या निधीतून सीसी रस्त्याचे भूमिपूजन यावेळी झाले. याप्रसंगी आशा शिंदे उपस्थित होत्या.

दुचाकीचा अपघात

मुदखेड - बारडपासून दोन कि.मी. अंतरावरील खैरगाव पाटीजवळ दोन दुचाकींचा अपघात झाला. यात दोघे जखमी झाले. लक्ष्मण शंकर येललकर व धनेश्वर येलमोले हे दोघे एम.एच.२६-यु.४७७३ या क्रमांकाच्या दुचाकीवर नांदेडकडे जात असताना खैरगाव पाटीजवळ त्यांना अपघात झाला. यात दोघेही जखमी झाले.

टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

लोहा - शिवजन्मोत्सव व महाशिवरात्र यात्रेनिमित्त धनज खु. येथे टेनिस बॉल खुल्या क्रिकेट स्पर्धा आयोेजित करण्यात आल्या आहेत. पहिले बक्षीस २१ हजार, द्वितीय ११ हजार दिले जातील. याशिवाय बेस्ट बॉलर, बेस्ट कीपर, मॅन ऑफ द सीरिजसाठीही पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.