शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
2
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
3
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
4
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
5
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
6
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
7
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
8
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
12
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
13
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
14
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
15
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
16
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
17
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
18
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
19
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
20
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे

पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:38 IST

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्क‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत नुकत्याच झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात जिल्ह्यातील संपूर्ण १६ तालुके हगणदारीमुक्त झाले असून अभियानांतर्गत जिल्ह्यात ३ लाख १९ हजार ८५६ शौचालयांचे बांधकाम पूर्ण आहे.जिल्ह्यात वर्ष २०१२ मध्ये जिल्ह्यात शौचालयांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील ९० हजार १४३ कुटुंबाकडे शौचालय असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय बांधकामांना गती मिळाली. अभियानांतर्गत राज्यासह जिल्ह्याला शौचालयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानंतर जिल्हा हगणदारीमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०१८ डेडलाईन देण्यात आली होती. अभियानांतर्गत शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांना शासनाच्या वतीने १२ हजार रूपयांचे अनुदान देण्यात येत आहे.दरम्यान, नागरिकांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करून शौचालयाचा वापर करावा, यासाठी प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी जनजागृती करण्यात आली होती. तसेच ज्या भागांत उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने ‘गुड मॉर्निंग ’ पथकाची स्थापना करण्यात आली. अभियानांतर्गत जिल्ह्यात वर्ष २०१७-२०१८ मध्ये एकूण १ लाख ९२ हजार ३८७ लाभार्थ्यांनी शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी झालेल्या पायाभूत सर्वेक्षणात नांदेड जिल्हा पाणंदमुक्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ११ हजार ८१३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच भोकर तालुक्यातील १८ हजार ३२२, बिलोली- २३ हजार ५५७, देगलूर तालुका- २८ हजार ५८६, धर्माबाद- ११ हजार ५८२, हदगाव तालुका - ४२ हजार ८४३, हिमायतनगर - १७ हजार ५२७, कंधार - ३९ हजार ८६८, किनवट - ४१ हजार ०४३, लोहा तालुका- ३६ हजार ६२३, माहूर- १६ हजार १९२, मुदखेड - १४ हजार ९७०, मुखेड - ३७ हजार ४४८, नायगाव - ३१ हजार ५३९, नांदेड - २२ हजार १८१ तर उमरी तालुक्यातील १५ हजार ९०५ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. अशा प्रकारे जिल्ह्यातील एकूण ३ लाख १९ हजार १४३ लाभार्थ्यांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे.३१ मार्चपूर्वी हगणदारीमुक्त झालेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने शुक्रवारी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात नांदेड, वाशिम, अमरावती आणि अकोला जिल्ह्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर