शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडसह चार रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना मोफत वायफाय सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:31 IST

रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.

ठळक मुद्देनरसापूर, जालना, परभणी स्थानकांवर मिळणार सुविधा

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने वर्ष २०१७ मध्ये नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना वायफायची सुविधा देणार असल्याचे सांगितले होते. त्या अनुषंगाने औरंगाबाद रेल्वे स्थानकावर वर्ष २०१७ मध्ये नि:शुल्क वायफाय सुविधेला सुरूवात करण्यात आली. परंतु, नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर काही तांत्रिक अडचणींमुळे ही सुविधा सुरू होऊ शकली नाही.दरम्यान, नांदेड रेल्वे प्रबंधक मंडळाच्या तांत्रिक विभागाने सर्व अडचणी दूर करून नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर या वर्षीपासून वायफायची सुविधा सुरू केली आहे. परंतु, सद्यस्थितीत रेल्वे प्रशासनाच्या वतीने अधिकृतरीत्या वायफाय सेवेचे उद्घाटन केलेले नाही. मात्र येत्या काही दिवसांत रेल्वे बोर्डाकडून परवानगी मिळाल्यानंतर अधिकृतरीत्या या सेवेचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनातील सूत्रांच्या वतीने सांगण्यात आले.३० मिनिटे घेता येईल सुविधेचा लाभप्रवासी ३० मिनिटांपर्यंत या सेवेचा मोफत लाभ घेऊ शकतात. त्यानंतर सदर सुविधा बंद होईल. जर एखाद्या प्रवाशाला यापेक्षा जास्त वेळ सुविधेचा लाभ घ्यावयाचा असल्यास संबंधित प्रवाशाला दुसरा मोबाईल क्रमांक देऊन सुविधेचा लाभ घेता येणार आहे.अखंडित वायफाय सेवेसाठी ३१ मोडेमची व्यवस्थानांदेड येथील श्री हुजूर साहिब रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना नि:शुल्क व अखंडित वायफाय सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी ३१ मोडेम बसविण्यात आले असून या मोडेमची रेंज ही ५० मीटरपर्यंत राहणार आहे. विशेष म्हणजे वायफायची स्पीड ही ‘एक जीबी’ राहिल्यामुळे प्रवासी अर्धा तास या सेवेचा लाभ घेऊ शकतात.प्रवाशांनी अशी घ्यावी वायफायची सुविधारेल्वे स्थानकावर प्रवासी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या मोबाईलचे वायफाय सुरू केल्यानंतर वायफाय कनेक्ट होईल. त्यानंतर संबंधित मोबाईलधारक प्रवाशांना सर्वप्रथम त्यांचा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी क्रमांक प्राप्त होईल. आणि तो क्रमांक टाकताच प्रवाशांना ३० मिनिटापर्यंत नि:शुल्क वायफाय सेवेचा लाभ मिळणार आहे.

टॅग्स :WiFiवायफायJalanaजालनाparabhaniपरभणी