शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ऋण फेडण्यासाठी आठ वर्षांपासून मोफत वासंतिक वर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:30 IST

उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.

अनुराग पोवळे ।नांदेड : उन्हाळी सुट्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गोडी कायम रहावी. त्याचवेळी आपण गावचे काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने गावकऱ्यांच्याच मदतीने कृष्णूर येथे गेल्या आठ वर्षांपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४० दिवसांचा मोफत वासंतिक वर्ग चालविण्यात येत असून हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.नायगाव तालुक्यात कृष्णूर येथील जि.प. शिक्षक वैजनाथ हंगरगे यांनी २००१ मध्ये नोकरी निमित्ताने गाव सोडले. त्यानंतर गावात ते कधी-मधी येत होते. कृष्णूर हे तसे खेडेच. शैक्षणिक वातावरणाची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण दहावी-बारावीपर्यंतच. त्यात मुलींचे तर दहावीच्या पुढे क्वचितच शिक्षण व्हायचे.किशोरवयीन विद्यार्थी हे शालेय जीवनात मिळणा-या कौतुकाच्या थापेने प्रोत्साहित होतात. हेच प्रोत्साहन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी हंगरगे यांनी पुढाकार घेताना लहान-मोठ्या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गावामध्ये सर्वांसमक्ष बक्षीस वितरण केले जाते. यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत गेले. शैक्षणिक वातावरण हळूहळू तयार होवू लागले. यातूनच २०१२ मध्ये कृष्णूर येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ४० दिवसांचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वासंतिक वर्ग सुरू केला. पहिल्या वर्षी हंगरगे यांनी स्वत: इतर दोन शिक्षकांना मानधन दिले. त्यानंतर मात्र गावकरी या उपक्रमात सहभागी झाले. गावकºयांनीही वासंतिक वर्गात शिकवणाºया शिक्षकांना मानधन देण्यासाठी लोकवर्गणी गोळा केली. याच वर्गणीतून हा उपक्रम आठ वर्षांपासून सुरू आहे. यंदा २ मे रोजी हा उपक्रम सुरू झाला असून ६५ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. वैजनाथ हंगरगे यांच्यासह जावेद शेख, दत्ता सूर्यवंशी, साधना कदम, सुधाकर ढगे हे शिक्षक दहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान, मराठी व स्पर्धा परीक्षा तोंडओळख हे विषय शिकवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे व त्यांच्यातील न्यूनगंड दूर व्हावा, हा या उपक्रमामागचा एकमेव हेतू असल्याचे हंगरगे यांनी सांगितले.कृष्णूर येथे सुरू असलेल्या मोफत वासंतिक वर्गात कृष्णूर येथे ज्या विद्यार्थ्यांचे नातेवाईक आहेत अशा दहा ते बारा गावचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. खाजगी शिकवणी परवडत नाही असे विद्यार्थी आपल्या नातेवाईकाकडे राहून ते वासंतिक वर्गाचा लाभ घेतात.

टॅग्स :NandedनांदेडEducationशिक्षण