शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चार टँकरने भागतेय नागरिकांची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:53 IST

जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे.

ठळक मुद्देकंधार तालुका : तांड्यावर पाण्यासाठी कसरत

कंधार : जलसाठे आटत आहेत़ भूगर्भातील पाणीपातळी खोलवर जात आहे़ पाणीस्त्रोत गायब होत असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस वाढणार असेच एकंदरीत चित्र आहे. तालुक्यात चार टँकरचा शिरकाव झाला आहे. कुरूळा, रेखातांडा, पोमातांडा, नरपटवाडी, जिवलातांडा येथील नागरिकांची तहान टँकरवर भागत असून पाण्यासाठी झुंबड उडत आहे. हरीलालतांडा, बदुतांडा, शिराढोणतांडा येथे पाणीटंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याचे चित्र असून टँकरच्या प्रतीक्षेत गावे आहेत.मागील वर्षी सरासरी पर्जन्यमान झाले नसल्याने नदी- नाले, तलाव, प्रकल्पात जलसाठे वाढले नाहीत. गत काही वर्षांत पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने पाणीसमस्या वाढत आहे. पाणीटंचाई प्रश्रावर उपाययोजना करण्यासाठी तालुकास्तरावर प्रयत्न केले गेले. दोन टप्प्याचा कृती आराखडा प्रस्ताव मंजुरीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला. तो उशिरा पाठविला अन् उशिरा मंजुरी मिळाली. त्यामुळे अंमलबजावणी उशीरच होईल, हे अपेक्षित होते.जानेवारी ते मार्च या कालावधीचा ५ कोटी १ लाख ३४ हजारांच्या खर्चास आणि ३९४ उपाययोजना करण्यास मंजुरी मिळाली. परंतु, अंमलबजावणी करण्यास मुहूर्त लांबत गेला. नवीन विंधन विहिरी, नळयोजना विशेष दुरूस्ती, पूरक नळयोजना, विंधन विहीर विशेष दुरूस्ती, विहीर अधिग्रहण, टँकरने पाणीपुरवठा, विहिरी खोल करणे/गाळ काढणे या उपाययोजना नावालाच राहिल्या. त्यासाठीचे प्रस्ताव, अंदाजपत्रक यातच वेळ गेला.एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांड्यावर पाणीपुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणीटंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.दुसऱ्या टप्प्यात उस्माननगर, आलेगाव, हाळदा, हणमंतवाडी, शेकापूर, तेलूर, कागणेवाडी, टोकवाडी, बोरी खु., चौकीतांडा, दैठणा, देवईचीवाडी, मजरे धर्मापुरी, धर्मापुरीतांडा, गुलाबवाडी, गुलाबवाडीतांडा, बिंडा, दिंडा, गुंडा, गुंटूर, गुंटूरतांडा, कळकावाडी, कल्हाळी, लालवाडी तांडा, लिंबा तांडा, राठोडनगर, मसलगा पु., नंदनवन , सोमसवाडी, महादेवमाळ तांडा, सावरगाव नि., शिराढोण, हिरामण तांडा, ढाकुनाईक तांडा, तेलंगवाडी, सोनमाळ तांडा, कौठा पु. आदी गावे, वाडी, तांडे पाणीटंचाईचा प्रखर सामना करीत आहेत. यावेळी उपाययोजना करताना प्रशासनाला प्राधान्याने कामे करावी लागणार आहेत.२६ एप्रिलपर्यंत ५६ पैकी ४० विंधन विहीर, विहीर अधिग्रहण प्रस्ताव मंजूर झाले. उर्वरित प्रस्तावात १ रद्द, काही तपासणीस्तरावर असल्याचे समजते. तात्पुरती पुरक नळयोजना व नळयोजना विशेष दुरूस्तीचे ३२ प्रस्ताव जिल्हास्तरावर मंजुरीसाठी प्रस्तावित असल्याचे समजते. मे महिन्यात पाणीटंचाईचा प्रश्न उग्र रूप धारण करेल. अशावेळी उपाययोजना करून नागरिकांची तहान भागविण्यासाठी कशी अंमलबजावणी होणार आहे. हा उत्सुकतेचा विषय असला तरी तांड्यावरील नागरिकांना मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे़एप्रिल ते जून कालावधीत उपाययोजना मंजूरकंधार तालुक्यातील पाणीटंचाईचे संकट सोडविण्यासाठी तहसीलदार सखाराम मांडवगडे, गटविकास अधिकारी कैलास बळवंत, उपमुख्य कार्यकारी अभियंता कारलेकर, अव्वल कारकून बळवंत वरपडे, पं.स.विस्तार अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करत आहेत़ एप्रिल ते जून या कालावधीसाठी दोन प्रकारच्या उपाययोजना व २३६ संख्यांना मंजुरी आहे. विहिरी अधिग्रहण, ६० टँकरने ५१ गावे, वाडी-तांडयावर पाणी पुरवठा करणे मोठे आव्हान आहे. हळूहळू पाणी टंचाईची गावे,वाडी,तांडे संख्या वाढण्याचे एकंदरीत चित्र आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाई