शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात चार घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 00:46 IST

जिल्ह्यात वेगवेगळ्या चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देतपासात श्वानपथक जागेवरच घुटमळले

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात वेगवेगळ्या चार घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी ३ लाख १८ हजारांचा ऐवज लंपास केला आहे़ याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मंगळवारी पहाटे डी मार्टजवळील जय रेसिडेन्सीमध्ये ब्रम्हानंद मारोतराव माचेवाड हे ३०३ क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतात. माचेवाड हे सोमवारी कौटुंबिक कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घर साफ केले. लोखंडी टॉमीने कुलूप तोडून चोरट्यांनी फ्लॅटमध्ये प्रवेश केला. कपाटाचे दार तोडून त्यामध्ये असलेले चार तोळ्याचे सोन्याचे गंठन, दोन तोळ्याचे लहान गंठन, सोन्याची अंगठी, झुमके असा एकुण १ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ या घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर ठाण्याचे सपोनि डमाले यांनी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. परंतु, श्वानाने मुख्य रस्त्यापर्यंतचाच माग काढला़ त्यानंतर श्वान जागेवरच फिरू लागल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्फळ ठरले़दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना ताजी असताना एका टिप्परची बॅटरी तसेच दुचाकीमधील पेट्रोल चोरट्यांनी लंपास केले. या परिसरात गेल्या काही दिवसांत भुरट्या चोऱ्या वाढल्या असताना आता चोरट्यांनी बंद घरांकडे आपला मोर्चा वळविला आहे़ या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कंधार तालुक्यातील मंगलसांगवी येथे चोरट्यांनी घर फोडून १ लाख ७ हजारांचा ऐवज लंपास केला़ आनंदा विश्वनाथ कदम यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला होता़ सोन्याचे दागिने आणि रोख ८२ हजार रुपये चोरट्यांनी लांबविले़ याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ किनवट शहरातील भगतसिंगनगर येथे चोरट्यांनी रोख सोळा हजार रुपये लंपास केले़ अक्षय दीपकराव शिकलवार याच्या आजोबाच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला होता़ ही घटना ८ आॅक्टोबर रोजी घडली़ चोरट्याने रोख १६ हजार रुपये आणि बँकेचे जुने पासबुक नेले़ याप्रकरणी किनवट ठाण्यात गुन्हा नोंद झाला़तर देगलूर तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील बीएसएनएल टॉवरचे २५ हजार रुपये किमतीचे केबल चोरट्यांनी नेले़ याप्रकरणी संदीप उन्हाळे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद झाला़

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारी