शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यूप्रकरणी पतीस पाच वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 23:38 IST

कापडाचे दुकान चालविण्यासाठी माहेराहून पैसे घेवून येण्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली़ ही घटना उमरी येथे घडली़ याप्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपी पतीस पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कापडाचे दुकान चालविण्यासाठी माहेराहून पैसे घेवून येण्याच्या मागणीला कंटाळून विवाहितेने विष प्राशन करुन आत्महत्या केली़ ही घटना उमरी येथे घडली़ याप्रकरणी भोकर न्यायालयाने आरोपी पतीस पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे़उमरी येथील संगीता सूर्यकांत राहूलवार या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून त्रास दिला जात होता़ कापड दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळीकडून त्यांना माहेराहून एक लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात येत होती़, परंतु माहेरची आर्थिक स्थिती बेताची असल्यामुळे संगीता या त्यांची मागणी पूर्ण करु शकत नव्हत्या़ त्यामुळे नेहमी होणाºया या त्रासाला कंटाळून संगीता यांनी विष प्राशन केले होते़ उपचारासाठी त्यांना नांदेडातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता़ याप्रकरणी उमरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता़ पोलिसांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़या प्रकरणात भोकरचे न्या़ शेख यांनी आरोपी पती सूर्यकांत राहूलवार याला विवाहितेचा छळ आणि मृत्यूस कारणीभूत या कलमाखाली दोषी ठरवित पाच वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला़ या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले़ सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड़रमेश राजूरकर यांनी बाजू मांडली़