शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात आणखी पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 19:42 IST

coronavirus नांदेड जिल्ह्यात उपचार घेत असलेले रुग्ण १४४६

ठळक मुद्दे१०१ बाधित आढळलेतर २१२ जणांची कोरोनावर मात

नांदेड : मागील २४ तासात जिल्ह्यातील पाच बाधितांचा उपचारास प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला आहे़ त्यामुळे एकूण कोरोना बळींची संख्या ४८८ एवढी झाली आहे़ तर मागील २४ तासात आरटीपीसीआर तपासणीद्वारे २६ आणि अँटीजेन तपासणीसाठी ७५ असे १०१ नवे बाधित आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या १८ हजार १८० वर पोहचली आहे़

रविवारी कोरोना तपासण्या घटल्याचे दिसून येते़ त्यामुळे सोमवारी केवळ ४१३ तपासण्यांचे अहवाल प्राप्त झाले़ त्यातील २८७ निगेटीव्ह तर १०१ पॉझीटीव्ह अहवाल आले़ यामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २०, हिमायतनगर १, मुदखेड १, नांदेड ग्रामीण २ तर भोकर आणि माहूर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला़ अँटीजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ६८, लोहा, देगलूर, परभणी, नांदेड ग्रामीण आणि धर्माबाद तालुक्यात प्रत्येकी एक तर नांदेड ग्रामीणमध्ये दोन नवीन रुग्ण निष्पन्न झाले़ सोमवारी जिल्ह्यातील २१२ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे़ यामध्ये विष्णुपूरी येथील वैद्यकीय महाविद्यालयातील ७, अर्धापूर ३, माहूर ६, किनवट ३, नायगाव ६, मुखेड ८, जिल्हा रुग्णालय ८, देगलूर, लोहा प्रत्येकी २ तर एनआरआय, पंजाब भवन आणि होम आयसोलेशनमधील १४२ जणांसह खाजगी रुग्णालयातील २२ जणांनी कोरोनावर मात केली़ त्यामुळे आजवर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १६ हजार १३० एवढी झाली आहे़

४५ जणांची प्रकृती गंभीरमागील २४ तासात पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे़ यामध्ये विष्णुपूरी येथील रुग्णालयात कंधार तालुक्यातील कौठा येथील ८२ वर्षीय पुरुष, लोहा तालुक्यातील वडेपुरी येथील ७२ वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील देगलूर नाका येथील ५२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला़ तर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कंधार तालुक्यातील शिवाजीनगर येथील ६० वर्षीय पुरुष आणि नांदेड शहरातील बसवेश्वर नगर येथील ५४ वर्षीय पुरुषाचाही कोरोनाने बळी घेतला़ दरम्यान सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात १ हजार ४४६ जणांवर विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असून त्यातील ४५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले़

आजवर घेतलेले स्वॅब ९९५९२एकूण निगेटिव्ह ७८१३३एकूण पॉझिटिव्ह १८१८०कोरोनामुक्त झालेले रुग्ण १६१३०एकूण मृत्यू संख्या ४८८उपचार घेत असलेले रुग्ण १४४६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड