शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

आधी पुनर्वसन मग लेंडी धरण; मेधा पाटकर यांनी प्रशासनासमोर मांडली भूमिका

By प्रसाद आर्वीकर | Updated: December 21, 2023 17:06 IST

३८ वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, लाभार्थी यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मेधा पाटकर २१ डिसेंबर रोजी नांदेड येथे आल्या होत्या

नांदेड : ३८ वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील गावातील प्रकल्पग्रस्तांचे हक्क, अधिकार त्यांना मिळालेच पाहिजेत. त्यामुळे आधी पुनर्वसन आणि मग धरण अशी आमची भूमिका असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी प्रशासनासमोर मांडली.

३८ वर्षांपासून रखडलेल्या लेंडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील प्रकल्पग्रस्त शेतकरी, लाभार्थी यांच्या व्यथा ऐकण्यासाठी मेधा पाटकर २१ डिसेंबर रोजी नांदेड येथे आल्या होत्या. नांदेड येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या समवेत त्यांनी या प्रकल्पाच्या अनुषंगाने चर्चा केली. यावेळी माजी खासदार व्यंकटेश काब्दे यांच्यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. 

मेधा पाटकर यांनी सांगितले, या प्रकल्पाच्या संदर्भाने जिल्हाधिकारी राऊत यांच्याशी संवाद झाला आहे. १९८३ पासून प्रकल्पाचे पुनर्वसन बाकी आहे. प्रकल्पाच्या क्षेत्रातील १२  गावांची गावठाण जमीन आणि ७ गावांची जमीन बुडीत क्षेत्रात येते. या प्रकल्पग्रस्तांना त्यांचा न्याय अधिकार मिळाला पाहिजे. २०१३ च्या कायद्यानुसार सर्व निर्णय प्रक्रिया होऊन कायद्यानुसारच पुनर्वसनाची कामे झाली पाहिजेत, याविषयी चर्चा झाली. आधी पुनर्वसन मग धरण, अशी भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या प्रश्नावर मंत्रालयात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.नियम बदलले त्याचा फटकामहाराष्ट्र शासनाने बुडीत क्षेत्राचे राष्ट्रीय पातळीवरील नियम बदलले आहेत. बुडीतची लेवल कमी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम याच वर्षी नर्मदेच्या खोऱ्यात पहावयास मिळाला. नर्मदेला आलेल्या पुरामुळे हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेली. विशेष म्हणजे ही जमीन संपादित केलेली नव्हती. लेंडी प्रकल्पाच्या बाबतीतही पुनर्वसन झाल्यानंतरही असे परिणाम दिसू शकतात. त्यामुळे याबाबतीतही आताच विचार करणे गरजेचे आहे, असे मेधा पाटकर म्हणाल्या.

टॅग्स :NandedनांदेडMedha Patkarमेधा पाटकर