शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आधी MBBS, आता तर थेट UPSC पास; लाँड्रीचालकाच्या मुलाने बापाच्या कष्टाचे चीज केलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:38 IST

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमबीबीएसनंतर शासकीय नोकरी स्वीकारली असली तरी पूर्वीपासून ध्येय यूपीएससी पास होणे होते.

- अविनाश चमकुरे नांदेड : देशातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नागरी सेवेत पदार्पण करत शहरातील एका लाँड्रीचालकाच्या मुलाने इतिहास घडवला आहे. परिस्थितीचा बाऊ न करता अभ्यासाला प्राधान्य देत प्रारंभी एमबीबीएस करून वैद्यकीय अधिकारी व त्यानंतर यूपीएसीच्या माध्यमातून यश संपादन करून समाजाची सेवा करण्याचा वसा घेऊन वाटचाल करणार असल्याची प्रतिक्रिया यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त केलेले डॉ. शिवराज राजेश गंगावळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. डॉ. शिवराज गंगावळ यांनी देशभरात ७८८ वी रॅंक पटकवली आहे.

भारतीय नागरिक सेवा अर्थात यूपीएससी या अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या परीक्षेचा निकाल आज घोषित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावरची एकमेव प्रदूषणमुक्त परीक्षा म्हणून यूपीएससी परीक्षेकडे पाहिले जाते. या परीक्षेत नांदेड शहरातील होळीवरील रहिवाशी तथा प्रसिद्ध उद्योजक बालाजी इबितदार यांचे जावई डॉ. शिवराज राजेश गंगावळ यांनी अथक परिश्रमातून यश मिळवले आहे. डॉ. शिवराज गंगावळ हे सध्या मुखेड तालुक्यातील बारहाळी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. शिवराज गंगावळ यांच्या वडिलांनी लाँड्री व्यवसाय करत अथक परिश्रमातून शिवराज यांचे शिक्षण पूर्ण केले. दुसरा मुलगा राजस्थान येथे एमबीए करत असून मुलगीही डॉक्टर झाली आहे. 

शिवराज यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण प्रतिभानिकेतन हायस्कूल, बारावीचे शिक्षण यशवंत महाविद्यालयातून, तर वैद्यकीय शिक्षण कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एमबीबीएसनंतर शासकीय नोकरी स्वीकारली असली तरी पूर्वीपासून आपले ध्येय यूपीएससी होती. हा प्रवास सोपा नव्हता. सलग चार वेळा या परीक्षेत अपयश आले. पाचव्या प्रयत्नात मुख्य परीक्षेसह मौखिकपर्यंत मजल मारली; परंतु यश काही आले नाही. सहाव्यांदा पुन्हा जोमाने तयारी करून यश मिळविले. यूपीएससी ही मॅरेथॉन असून विजय मिळेपर्यंत संपूर्ण ताकदीनीशी तयारी केली पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगNandedनांदेड