शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबार प्रकरणात चोरीच्या गाडीमुळे मारेकरी जाळ्यात;‘जीपीएस’ची झाली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 19:54 IST

जंगलात पोलीस होते पाळत ठेवून

- शिवराज बिचेवार

नांदेड : लूट करण्याच्या उद्देशाने आलेल्या आरोपींनी शहरात दोन ठिकाणी गोळीबार गेला. ऐन निवडणुकीच्या काळात या घटना घडल्या. यात अहमदपूर येथील तरुणाचा मृत्यू झाला. यावेळी आरोपींनी पळविलेल्या गाडीनेच मारेकरी जाळ्यात अडकले. कारमधील जीपीएसमुळे पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध घेतला. बारा तासाहून अधिक काळ जंगलात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी अखेर आरोपींना बेड्या ठोकल्या. सुरेंद्रसिंग ऊर्फ सुरज जगतसिंघ गाडीवाले आणि शुभम राजकुमार कुलगुडे अशी त्या आरोपींची नावे आहेत़ 

८ एप्रिलच्या रात्री अहमदपूर येथील शेख नजीब अब्दुल गफार यांची (एम़एच़२४, एएस ८४४७) कार अडवून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या़ यात शेख नजीब यांचा जागीच मृत्यू झाला होता़ त्यानंतर आरोपी ही कार घेऊन पसार झाले़ तत्पूर्वी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांनी डॉ़सतीश गायकवाड कुटुंबियांना अशाच पद्धतीने अडवून गोळीबार केला. परंतु सुदैवाने गायकवाड कुटुंबिय बचावले़ पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेला आरोपींचा शोधार्थ पाठविले़ सर्वप्रथम मयताची ओळख पटविण्यात आली़ मयताचा भावाने दिलेल्या माहितीवरुन, आरोपींनी नेलेल्या कारमध्ये जीपीएस यंत्रणा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़ त्यानंतर पोलिसांनी जीपीएसवरुन कार ट्रॅक करण्यास सुरुवात केली़ सुरुवातीचे काही तास ही कार बंदच होती़ त्यानंतर ती सुरु करुन आरोपी शंखतीर्थ परिसरात गेले़ ही माहिती जीपीएसवरुन सपोनि विनोद दिघोरे व त्यांच्या पथकाला मिळाली़ स्थागुशाचे हे पथक लगेच शंखतीर्थकडे रवाना झाले़ तोपर्यंत पहाट झाली होती़ आरोपी शंखतीर्थ परिसरात जंगलाच्या शेजारी कार पार्क करुन निघून गेले होते़ पण, पोलिसांनी संयम पाळत जंगलातच थांबण्याचा निर्णय घेतला़ आळीपाळीने तीन कर्मचारी जंगलात थांबून आरोपींची वाट पाहत होते़ 

...अन् दोन्ही आरोपी सापडलेपोलिस लक्ष ठेवून असताना जंगलातील कार नेण्यासाठी आरोपीचा भाऊ आला अन् तेथेच घात झाला़  पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले़ त्याच्या माहितीवरुन आरोपीच्या पल्सर या दुचाकीचा क्रमांक मिळविला़ ही दुचाकी जगतसिंघ गाडीवाले याच्या नावावर असल्याचे कळताच पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारुन त्याच्या मुसक्या आवळल्या़ तत्पूर्वीच शुभम कुलगुडे याला अटक केली होती़ एकाच दिवशी अर्ध्या तासाच्या अंतराने झालेल्या दोन गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली होती़ परंतु ४८ तासांच्या आत तपास करीत पोलिसांनी दोन्ही मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या़ 

पोलीस अधीक्षकांचा पाठपुरावा आरोपी जीपीएस यंत्रणा असलेली कार घेऊन पसार झाल्याचे कळताच पोलीस अधीक्षकांनी सर्व यंत्रणांना कामाला लावले़ खबऱ्यांना अलर्ट देण्यात आला़ जीपीएस किती वेळा बंद झाले अन् ती कार कोणत्या दिशेला जात आहे, याबाबत स्थागुशाच्या पथकाला सूचना देत होते़ शंखतीर्थला कार सुरु होईपर्यंत पथकातील कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा करताना काय खबरदारी घ्यावी, याबाबतही ते सांगत होते़ 

टॅग्स :ArrestअटकjailतुरुंगRobberyदरोडाNandedनांदेड