शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

धावत्या बसला लागली आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:35 IST

नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.

ठळक मुद्देचालकाचे प्रसंगावधान : ५० प्रवासी सुखरूप

किनवट : नागपूरहून किनवटकडे येणाऱ्या रामटेक आगाराच्या बसने अंबाडी घाटात अचानक पेट घेतल्याने प्रवाशांत एकच तारांबळ उडाली. चालकाने प्रसंगावधान राखत धावती बस रस्त्याच्या बाजूला लावल्यानंतर बसमधून उतरण्यासाठी मोठी झुंबड उडाली. ही घटना १९ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वासात वाजता घडली.रामटेक आगाराची एम. एच. १४ बीटी ४३९९ क्रमांकाची एसटी बस नागपूरहून किनवटकडे येत होती़ कठीण वळणाच्या अंबाडी घाटात सायंकाळी सव्वासात वाजता पिंपळगावकडून घाट चढत असताना कठीण वळणाच्या ठिकाणी धावत्या बसच्या इंजिनजवळ गेअर लिवर जवळ अचानक पेट घेतला तेव्हा चालक अमोल पवार यांनी प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला थांबविली़ त्यावेळी अक्षरश: बसमधील प्रवाशांची खाली उतरण्यासाठी एकच झुंबड उडाली़ अचानक आग लागल्याने सर्व प्रवासी भयभीत झाले होते़बसमध्ये असलेल्या पाण्याने व मातीने आग आटोक्यात आणण्यासाठी चालक व वाहकांनी प्रयत्न केले़ बस थांबल्यानंतर पन्नास प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सर्व प्रवाशांना मागून येणाºया चंद्रपूर किनवट बसमध्ये बसवून किनवटला पाठविण्यात आले, असे बसमधील प्रवासी श्यामराव मुत्यालवार यांनी सांगितले. धावती बस पेटली; पण चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप बाहेर आले.तालुक्यातील सक्रूनाईकतांडा येथील ३९ प्रवासी हे हैदराबाद तिरुपती आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेसने हैदराबाद येथे जाण्यासाठी किनवटला येत होते़ अचानक बसने पेट घेतला तेव्हा प्रवासी गोंधळले, असे बसचालक अमोल पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़

टॅग्स :NandedनांदेडfireआगBus Driverबसचालक