दहा दुकानांना सील
भोकर : शहरातील दहा दुकानांना सील करण्याची कारवाई महसूल व नगर परिषद प्रशासनाने केली. कोरोना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप दुकान मालकांवर आहे. यामध्ये फर्निचर, हार्डवेअर, फुटवेअर, कापड दुकान, मोबाइल, स्टील भांडी दुकान आदींचा समावेश आहे. यावेळी तहसीलचे बी.के.राऊत, गोविंद राचेवाड, पालिकेचे सचिन वैष्णव, संतोष पांचाळ, पंचायत समितीचे यशवंतकर, पोलीस कॉन्स्टेबल नागरगोजे, तेलंग आदी उपस्थित होते.
भीमजयंती उत्साहात
कंधार : तालुक्यातील पानभोसी येथे २८ एप्रिल रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३०वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच राजश्री भोसीकर, मनोहर पाटील भोसीकर, उपसरपंच शिवकुमार भोसीकर, सदस्य सुमनबाई जोंधळे, शेख सय्यद, विश्वंभर डुबुकवाड, शेख रहीम, भानुदास वाघमारे, बाबाराव लुंगारे, दिलीप जोंधळे, विश्वंभर जोंधळे, सीताराम जोंधळे आदी उपस्थित होते.
चारा दान करण्याचे आवाहन
नांदेड : खडकुत येथील गोशाळेत १२०० गाई आहेत. मात्र कोरोनामुळे गाईंना चाऱ्यापासून वंचित राहावे लागत असल्याने लोकप्रतिनधी, समाजसेवक व गोभक्तांनी चारा देण्याचे आवाहन प.पू. जगदीश बाबा यांनी केले. मागील २५ वर्षांपासून जगदीश बाबा गोशाळा चालवितात. मात्र कोरोनामुळे गाईंवर बिकट परिस्थिती ओढावली आहे.
कावळगाव येथे जंतुनाशक फवारणी
देगलूर : देगलूर तालुक्यातील कावळगाव येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जंतुनाशक फवारणी करण्यात आली. या उपक्रमात विजय पाटील, माधव वाडेकर, सतीश वंटे, भीमराव चिंचोले, माराेती धुळेकर, राजू अंगडे, बाबू अंगडे, हणमंत दिंडे आदींनी पुढाकार घेतला. फवारणीमुळे कोरोनाला आळा बसेल असा विश्वास गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी
नायगाव : तालुक्यातील घुुंगराळा येथे लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळणार असल्याची माहिती वसंत सुगावे पाटील यांनी दिली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सुगावे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेची मान्यता द्यावी, दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांच्याकडे गावात पशुवैद्यकीय दवाखान्याची मंजुरी मिळावी आदी मागण्याही केल्या आहेत.
शिलाई मशीनचे वाटप
देगलूर : तालुक्यातील करडखेड ग्रामपंचायतीच्या वतीने १४व्या वित्त आयोग महिला व बालकल्याण विकास निधीअंतगर्गत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. यावेळी बीडीओ राजकुमार मुक्कावार, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, सरपंच राधाबाई शेळवणे, सदस्य बालाजी इबितवार, अशोक कोकणे, अरविंद गडपवार, अहमद चाैधरी, फयाज शेख, ग्रामविकास अधिकारी तोटावार, अशोक हंगरगे, नरसिंगराव कोकणे, बालराज कडेवार, मुरलीधरराव कोणे, शंकर शिळवणे आदी उपस्थित होते.
बैल बाजार भरलाच
बिलोली : एकीकडे लाॅकडाऊन असताना दुसरीकडे २७ एप्रिल रोजी बिलोलीत बैल बाजार भरवण्यात आला. बाजारात लोकांची गर्दी झाली होती. प्रशासनाने मात्र याबाबत बघ्याची भूमिका घेतली. प्रशासन एकीकडे संचारबंदीची घोषणा करीत असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.