शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबादच्या उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 00:22 IST

येथील उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या कारभाराला कंटाळून १२ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचे पत्र गुरुवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे दिले़ राजकीय क्षेत्रात या प्रस्तावामुळे खळबळ उडाली़ यावर काय निर्णय होतो, याकडे धर्माबादवासियांचे लक्ष लागले आहे़

ठळक मुद्देसर्वपक्षीय ठराव : उपनगराध्यक्षाच्या कारभाराला कंटाळलेल्या १२ नगरसेवकांचे मुख्याधिकाऱ्यांना पत्र

धर्माबाद : येथील उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्या कारभाराला कंटाळून १२ नगरसेवकांनी अविश्वास ठरावाचे पत्र गुरुवारी मुख्याधिकारी व नगराध्यक्षांकडे दिले़ राजकीय क्षेत्रात या प्रस्तावामुळे खळबळ उडाली़ यावर काय निर्णय होतो, याकडे धर्माबादवासियांचे लक्ष लागले आहे़अविश्वास ठरावावर काँग्रेसचे नीलेश पाटील बाळापूरकर, साधना सुरकूटवार, राष्ट्रवादीचे भोजराज गोणारकर, सुनीता जाधव, अहमदी बेगम, नजीमबेगम, भाजपाचे संजय पवार, साय्यारेड्डी गंगाधरोड, कविता बोल्लमवार, रूपाली अशोक पाटील बाळापूरकर, युनूस खान, महादाबाई वाघमारे यांच्या स्वाक्षºया आहेत.नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष मनमानी करीत असल्याचा आरोप करून १२ नगरसेवक एकत्र आले व त्यांनी उपनगराध्यक्षाविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला़धर्माबादच्या विकासासाठी मिळणाºया निधीच्या कारणावरून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक असे गट पालिकेत तयार झाले़१२ नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादीचे ४, भाजपाचे ४, काँग्रेस २, अपक्ष दोघांचा समावेश आहे़काही दिवसापूर्वी झालेले पालिकेच्या सर्वसाधारण सभेवर या १२ नगरसेवकांनी बहिष्कार टाकला होता़ नंतर तब्येतीच्या कारणावरून नगराध्यक्षा श्रीमती अफजल बेगम अब्दुल सत्तार यांनी सर्वसाधारण सभा रद्द केली होती़ यावेळी या १२ नगरसेवकांनी सभागृहाच्या बाहेर सभा घेतली़मधल्या काळात लोकसभा निवडणुकीची धामधूम असल्याने काहीही हालचाली झाल्या नाहीत़ निवडणुकीचा निकाल लागताच पुन्हा या १२ नगरसेवकांनी उचल खाल्ली आणि त्यांनी उपनगराध्यक्षांविरूद्ध अविश्वास ठराव दाखल केला़ यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार नगरसेवकांची समजूत काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी केला खरा, मात्र त्यांनाही या नगरसेवकांनी जुमानले नाही़पक्ष आता त्यांच्याविरूद्ध काय कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़धर्माबाद पालिकेच्या निवडणुका १८ डिसेंबर २०१६ रोजी झाल्या होत्या़ यात राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, काँग्रेसचे २, भाजपाचे ४ व तीन अपक्ष निवडून आले होते़नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून झाली़ यात काँग्रेसच्या अफजल बेगम अब्दुल सत्तार निवडून आल्या होत्या़

उपनगराध्यक्ष विनायकराव कुलकर्णी यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात आला़ ही माहिती जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात येईल़ अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी बैठक घ्यावी लागते़ जिल्हाधिका-यांनी दिलेल्या आदेशान्वये पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल                               -गंगाधर पेंटे, प्रभारी मुख्याधिकारी, धर्माबाद पालिका़शहरातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस व माजी आ़ बापूसाहेब देशमुख यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या १० नगरसेवकांना निवडून दिले होते़ त्यातील चौघांना विकासकामांचे काही देणेघेणे नाही़ फक्त त्यांना कोणत्याही कामात दक्षिणा कशी मिळेल यात स्वारस्य आहे़ माझ्याविरूद्धचा अविश्वास ठराव का दाखल करण्यात आला याचे कारण जनतेला माहीत आहे़ ठराव बारगळणारच़ पक्षविरोधी कारवाई करणा-या नगरसेवकांना पक्ष व जनता धडा शिकवेन                                                                 - विनायकराव कुलकर्णी, उपनगराध्यक्ष, धर्माबाद पालिका़

टॅग्स :Nandedनांदेडnagaradhyakshaनगराध्यक्ष