शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन गटांत हाणामारी, तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:41 IST

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमाहुरात तिघे जखमी टोळक्यांनी केली लूटमार

माहूर : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या एका कार्यकर्त्यांने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्यांच्या परिवारावर खालच्या पातळीवर केलेल्या वक्तव्यावरून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तिघे जण जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीला प्रथम यवतमाळ व नंतर सावंगी मेघे येथील मेघे हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.१९ एप्रिल रोजी माहूर शहरात सकाळी ११ वाजेच्या सुमारास वॉर्ड क्रमांक १३ मधील मारुती मंदिराजवळ हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर दुपारी एक ते दोनच्या दरम्यान शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन जोगाराम राठोड (नाईक), सोनू ऊर्फ आशिष चारभाई, पवन शर्मा, शक्ती ठाकूर, अविनाश मोहन राठोड, अक्षय परस्कर, संदीप हुसे व इतर २० ते २५ लोकांच्या जमावाने कुठलेच कारण नसताना नगराध्यक्षाचे बंधू सरफराज दोसानी यांच्या मालकीचे न्यू माहेर कलेक्शन या कापड दुकानात हातात घण (दगड फोडण्याचा हातोडा) लाठ्या, काठ्या, लोखंडी रॉड घेऊन दुकानात घुसून दुकानातील माल लुटण्याचा प्रयत्न केला व दहशत निर्माण केली. शुक्रवार दिवसभराच्या व्यवसायाची रोख रक्कम व १७ व १८ रोजी बँक बंद असल्याने दोन दिवसांची व्यवसायाची रक्कम असे एकूण दोन ते अडीच लक्ष रुपये गल्ल्यातून काढून घेतल्याचा आरोप आहे.सेनेच्या जमावाने दहशत पसरवत शहरातील व्यापाऱ्यांना आपली प्रतिष्ठाने बंद करण्यास भाग पाडले. या घटनेची दखल घेत कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनात माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांनी काही पोलीस कर्मचारी निवडणूक बंदोबस्तात दुसरीकडे गेलेले असताना सिंदखेड व महागाव पोलिसांना पाचारण करून सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद घोडके यांच्या सहकार्याने चोख बंदोबस्त ठेवला. शहरात तूर्तास शांतता अबाधित राहिली असली तरी माहूर शहरात तणावपूर्ण शांततेचे वातावरण आहे. दरम्यान, तालुक्यातील व शहरातील कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी भोकरचे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार पवार, माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल हे माहूर येथे ठाण मांडून बसले आहेत.वादाचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वाई बाजार येथे झालेल्या शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारसभेत जि.प.चे उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर जाहीर भाषणात अर्वाच्च भाषेत कौटुंबिक टिपण्णी केल्यानेच राग अनावर होऊन हा प्रकार घडल्याची चर्चा होती.

  • जखमीवर माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉ. विजय मोरे, डॉ.निरंजन केशवे यांनी प्रथमोपचार करून यवतमाळकडे रेफर केले. या हाणामारीत एमआयएम नगरसेविकेचा मुलगा शे.सज्जाद शे. अजीज हा गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयातून सावंगी मेघे येथे हलविण्यात आले.
टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडCrime Newsगुन्हेगारी