शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

अपक्षांना भुईमूग,भेंडीसह पेनड्राईव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 00:27 IST

लोकसभा निवडणुकीत अपक्षांसाठी टॉफी, भेंडी, लॅपटॉप, लुडो, शिटी, पेनड्राईव्ह, हेल्मेटसह आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देलोकसभा निवडणूकसात चिन्हे राखीव, तर १९४ चिन्हे अपक्षांसाठी उपलब्ध

नांदेड: लोकसभा निवडणुकीत अपक्षांसाठी टॉफी, भेंडी, लॅपटॉप, लुडो, शिटी, पेनड्राईव्ह, हेल्मेटसह आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीसाठी १९ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. २६ मार्चपर्यंत उमेदवारी दाखल करता येणार आहेत. या नामनिर्देशनपत्राची छाननी २७ मार्च रोजी होईल. २९ मार्चपर्यत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत. २९ रोजीच उमेदवारांना निवडणूक चिन्हही दिले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे ७ चिन्हे राखीव आहेत. त्यामध्ये काँग्रेसचा हात, भाजपाचे कमळ, बसपचा हत्ती, कम्युनिष्ट पार्टीचा विळा आणि कणीस तसेच हातोडा, विळा, राष्टÑवादी काँग्रेसचे घड्याळ आणि तृणमल काँग्रेसचे फुले आणि गवत हे सात चिन्हे राष्टÑीय पक्षांचे आहेत. त्याचवेळी १३ राज्यांतील राज्यस्तरीय पक्षांचे चिन्हे त्या त्या पक्षांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने तब्बल १९४ निवडणूक चिन्हे उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात टॉॅफीसह तंबू, चिमटा, टूथब्रश, टूथपेस्ट, ट्रक, सिरींज, टीव्ही रिमोट, स्टॅप्लर, चहा गाळणी, सितार, कैची, स्पॅनर (पाना), पाटी, अंगठी, कुलर, रोलर, पेन्सील शॉपनर, उशी, मटर, भुईमूग, पेन स्टँड, भेंडी, पत्रपेटी, माईक, काडीपेटी, लंचबॉक्स, हेलिकॉप्टर, हेल्मेट, इस्त्री, चावी, किटली, फणस, हिरवी मिरची, हार्मोनियम, अंगुर, टोपी, फुटबॉल, नरसाळे, झगा, लिफाफा, डिशअँटींना, हिरा, डोली, बाज, आईस्क्रीम, हेडफोन, काचेचा ग्लास, हातगाडी, बासरी, डंबेल्स, कपबशी, साखळी, जातं, पोळपाट-लाटणे, संगणक, बादली, कॅमेरा, कॅलक्युलेटर, विटा, ब्रेड, बिस्कीट, बेल्ट, डिझेलपंप, ड्रिल मशीन, अद्रक, पँट, प्रेशर कुकर, पेट्रोलपंप, फ्रीज, रोडरोलर, दुर्बीण, सायकल पंप आदी १९४ निवडणूक चिन्ह उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख २९ मार्च आहे. २९ मार्च रोजी जे जे उमेदवार रिंगणात आहेत त्या अपक्ष उमेदवारांना उपरोक्त चिन्हांपैकी एक चिन्ह निवडावे लागणार आहे.तिघांनी भरले उमेदवारी अर्जनांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १९ मार्चपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येत आहेत. पहिल्या दिवशी काल एक अर्ज दाखल झाला होता, तर ५१ उमेदवारांनी ९३ अर्ज नेले होते. बुधवारी दुसऱ्या दिवशी आनंद पांडुरंग नवघड या अपक्ष उमेदवाराने तसेच अंकुश शिवाजीराव पाटील अपक्ष व राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीने उमेदवारी दाखल केली. अल्ताफ अहेमद एकबाल अहेमद यांनी इंडियन युनियन मुस्लिम लीगच्या वतीने आपली उमेदवारी दाखल केली असून त्यांनी तीन अर्ज भरले आहेत. उद्या नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत.कर्मचारी नियुक्त्यांचे काम अंतिम टप्प्यातलोकसभा निवडणुकीत मुख्य उमेदवार हे २५ व २६ मार्च रोजीच उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. २१ मार्च धुलीवंदनाचा दिवस आहे. धुलीवंदनानंतर चौथा शनिवार व रविवार येत आहे. त्यामुळे मुख्य उमेदवारांचे अर्ज हे २५ व २६ मार्च रोजीच येतील, असेही स्पष्ट होत आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. विविध प्रशिक्षणे, आवश्यक साहित्यांची जुळवणी केली जात आहे. मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचे कामही अंतिम टप्प्यात आल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांनी सांगितले.चव्हाण दांपत्यांसाठी उमेदवारी अर्जलोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रमुख पक्षांकडून नेमके कोण रिंगणात उतरणार? याबाबत नांदेडकरांत मोठी उत्सुकता आहे. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्यासह आ. अमिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने २० मार्च रोजी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांनी तर आ. अमिता चव्हाण यांच्यासाठी काँग्रेस शहर महानगराध्यक्ष आ. अमरनाथ राजूरकर यांनी अर्ज नेले आहेत. दरम्यान, बुधवारी नांदेड लोकसभेसाठी एकूण २८ उमेदवारांनी ५१ अर्ज घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :NandedनांदेडElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक