शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

ताप, सर्दी, खोकल्याने किनवटकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 01:06 IST

तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना पडला तर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वाणवा व तपासणी उपकरणे हाताळणी करणारे तंत्रज्ञ नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.

ठळक मुद्देओपीडी चालवायची कशी? डॉक्टरांना पडला प्रश्न, जि.प.आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : तालुक्यात व्हायरल इन्फेक्शनमुळे गावोगावी ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकदु:खी या सारख्या आजाराने शहरासह ग्रामीण जनता त्रस्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने ओपीडी करावी कशी? ही चिंता उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाºयांना पडला तर गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची वाणवा व तपासणी उपकरणे हाताळणी करणारे तंत्रज्ञ नसल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत.किनवट तालुक्यात १९१ गांवे १०५ वाडीतांडे असून २ लक्ष ४७ हजार ७८६ लोकसंख्येला आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र, ६५ आरोग्य उपकेंद्र, एक नागरी दवाखाना, तसेच राज्याच्या आरोग्य विभागाचे गोकुंदा येथे उपजिल्हा रुग्णालयात, मांडवी येथे ग्रामीण रुग्णालय तसेच फिरते आरोग्य पथके कार्यान्वित असतांना अनेक समस्येमुळे जनतेला आरोग्यसेवा विनाविलंब मिळणे कठीण झाले. शासकीय दवाखान्यात गोळ्या औषधांचा पुरवठाच नसल्याने कार्यरत डॉक्टर स्थानिक स्तरावर स्वखर्च करून भागवीत आहेत. वातावरणातील बदलामुळे सध्या विषाणूजन्य आजार व कीटकजन्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झाला. शासकीय असो की खासगी दवाखाने असो दररोज बाह्य रुग्णांचा आकडा दुपटीने वाढला. घरोघरी तीनचार जण ताप खोकला व इतर आजाराने फणफणू लागले आहेत़ विषमज्वराचेही प्रमाण वाढले. दवाखान्यात गर्दीच गर्दी झाली. जून महिन्यापासून गोळ्या औषधी पुरवठा नसल्याने कर्तव्यावर असणा-या डॉक्टरांना मात्र ही चांगलीच डोकेदुखी ठरली आहे़गोकुंदा उपजिल्हा रुग्णालय समस्यांच्या विळख्यात?गोकुंदा येथे कार्यान्वित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात गेल्या साडेतीन वर्षापासून कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक नाही़ प्रभारी अधिक्षकावरच मागविले जात आहे़ येथे एमडी़मेडीशन (फिजिशियन), स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, भूलतज्ञ पदे रिक्त आहेत़ स्त्री रोग व प्रसूती तज्ञ नसल्याने येथे बाळंतपणासाठी दाखल होणाºया गर्भवती महिलांना तेलंगणातील आदिलाबाद व इतर ठिकाणी रेफर करण्याची वेळ आली. गेल्या सहा महिन्यात १५६ गर्भवती महिलांना रेफर करण्यात आल्याची माहिती आहे़ सध्या गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ओपीडी वाढली आहे़ एरव्ही अडीचशे ते तीनशे असणारी ओपीडी सातशे ते आठशेवर जाऊन पोहोचली आहे़ अंतररुग्णही वाढले आहेत़१५६ गरोदर माता रेफर

  • स्त्री रोग तज्ञ व प्रसूती तज्ञा डॉ़पल्लेवार यांच्या सेवानिवृत्तीनंतर म्हणजे गेल्या सहा महिन्यांत १५६ गरोदर मातांना प्रसूतीसाठी रेफर करावे लागले़ जर तज्ञ डॉक्टर असते तर रेफरची वेळ आली नसती़ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी कार्यान्वित असलेल्या ईसीजी हाथाळन्यायासाठी टेक्निशियन व फिजिशियन नाही़ व्हेंटिलेटर आहे पण आॅपरेटर नाही, ब्लड स्टोरेज आहे पण टेम्परेचर दाखवत नाही़
  • सोनोग्राफी मशीनही उपजिल्हा रुग्णालयाची नाही़ माहुरच्या सोनोग्राफीवरच मागविले जात आहे़ या रुग्णालयाची रूग्णवाहिका धर्माबादला असून ट्रामाच्या रुग्णवाहिकेवरच भागविले जात आहे़ त्यामुळे नाव सोनाबाई हाती कथलाचा वाळा अशी म्हणण्याची वेळ आली आहे़ गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ईसीजी व इतर उपकरणे हाताळण्यासाठी टेक्निशियन नसल्याच्या वृत्ताला प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ़विकास जाधव यांनी दुजोरा दिला आहे़
टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल