शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वन्य प्राण्यांची शेतकऱ्यांना दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 00:30 IST

या घटनेमुळे परिसरातील नागरीक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वाघ आला रे वाघ आला़़़ या वातावरणात त्यांना आपले जीवन जगावे लागत आहे़

ठळक मुद्देपशुधनावर हल्लेवाघ आला रे वाघ़़़नागरिक भयभीत

पार्डी : दुष्काळाचे चटके आता जंगलातील प्राण्यांनाही बसू लागले आहेत. जंगलातील पाणवठे आटल्यामुळे गावची वाट धरली आहे. चोरंबा (ना.), निमगाव (ता. हदगाव) व लहान (ता. अर्धापूर) शिवारात वाघाने प्रचंड दहशत पसरवली असून गेल्या काही दिवसात दिवसात शेतातील प्राण्यांना वाघाने फस्त केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरीक व शेतकरी यांच्यात भीतीचे वातावरण पसरले असून वाघ आला रे वाघ आला़़़ या वातावरणात त्यांना आपले जीवन जगावे लागत आहे़निमगाव, चोरंबा, लहान परिसरातील जंगलात पाण्याचे पाणवटे आटल्यामूळे जंगलातील हिंस्र वन्यप्राण्यांचा पाण्याच्या शोधात गावाकडे वावर सुरू झाला आहे. हे तहानलेले व भुकेलेले हिंस्र प्राणी शेतक-यांचे पशूधन फस्त करीत आहेत. चोरंबा (ना.) व निमगाव परिसरात गेल्या दोन महिन्यापासून जंगलातील हिंस्त्र प्राण्यांचा वावर सुरू झाला आहे. मागील महिन्यात सोनाळा येथील लिंबाजी पांडूरंग ढाकरे यांच्या शेळ्यावर हल्ला करून एकाच रात्रीत १२ शेळ्या फस्त केल्या होत्या. त्यानंतर काही दिवसातच चोरंबा शिवारातील शेतकरी चक्रधर खानंसोळे यांच्या आखाड्यावर बांधलेली वगार (म्हैस) हल्ला करून ठार केली़ ही मृत म्हैस पाठीमागून ७५ टक्के त्या वाघाने खावून टाकली. त्यामुळे गावात वाघ आल्याची चर्चा सुरू झाली़१५ नोव्हेंबर रोजी पहाटे लहान शिवारातील पुंजाराम गाजेवार यांच्या आखाड्यावरील जनावरांपैकी तीन वर्षाच्या वासराचा वाघाने फडसा पाडला आहे. या महिन्यातील तिसरी घटना असून लहान शिवारामध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या रबीचा हंगाम असून शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीलाच जात असतात. जंगल परिसरातही अनेक गावे आहेत. परिसरातील गावकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगार, महीला व लहान मुले वाघामुळे भयभीत झाले आहेत. शेतकरी शेतात जात नसल्याने पिकांचे नुकसान होत आहे. या परिसरात मनाठा, चोरंबा-निमगाव, चाभरा, सावरगाव या वन बिटामध्ये अंदाजे २ हजार ५०० हेक्टर जंगल क्षेत्र असून बिबटे, तडस, लांडगे, कोल्हे असे वन्यप्राणी आढळतात.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीTigerवाघ