शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यासाठी शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 17:32 IST

शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा त्याआधीच योग्यवेळी मदत करावी

हदगाव (नांदेड) : गतवर्षीचा खरीप हंगामाचा पिकविमा कंपनीने लेखी आश्वासनानंतरही न दिल्याने शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रल्हाद पाटील हडसणीकर यांनी आज दुपारी तहसील कार्यालयासमोर अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे.

सन २०२०-२१ या वर्षी चा खरीप हंगाम ऐन काढणीच्या वेळेवर अतिवृष्टी झाल्याने खंगाम हातचा गेला पण शेतकऱ्यांनी भरलेला पिकविम्याचा परतावा मिळाला नाही. तो मिळावा यासाठी तालुक्यातील राजकीय नेते, शेतकरी संघटना यांनी रस्तारोको, आंदोलन जेलभरो आंदोलन केले होते. त्यावेळी तहसीलदार जिवराज डापकर व कृषी अधिकारी अविनाश रणवीर यांच्या मध्यस्थीने संबंधित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाली होती. त्यांनी नोव्हेंबर महिन्यात पिकविमा देण्याचे आश्वासन दिले होते पण ते हवेतच विरले.

यामुळे प्रकाराने संतप्त झालेल्या प्रल्हाद पाटील हडसणीकर या शेतकऱ्याने आज तहसील  कार्यालयात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक विजय डोंगरे यांनी तत्काळ प्रल्हाद पाटील यांच्या हातातील पेट्रोलची बॉटल खाली पाडली. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर मदत देण्यापेक्षा त्याआधीच योग्यवेळी मदत केली तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचतील अशा संतप्त भावना यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीCrop Insuranceपीक विमाNandedनांदेड