शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
3
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
4
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
5
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
6
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
7
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
8
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
9
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
10
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
11
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
12
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
13
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
14
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
15
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
16
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
17
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
18
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
19
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
20
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा

रात्रीच्या भारनियमनाचा फटका; शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून पिकांना द्यावे लागतेय पाणी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 18:25 IST

रात्रीला भिजवणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याच्याही घटना

ठळक मुद्देयंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

नांदेड :  नांदेड- शेतकऱ्यांकडून सध्या हिवाळ बागायत पीकांना पाणी देण्याची लगबग सध्या सुरु आहे. परंतू शासनाकडून वेगवेगळ्या पाळीमध्ये वीज पुरवठा केला जात असल्याने सिंचनासाठी शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतीला दिवसा वीज पुरवठा केला जात नसल्याने शेतकऱ्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी जागरण करुन पीकां पाणी द्यावे लागत आहे. 

यंदा मुबलक प्रमाणात पावसाळा झाल्याने नांदेड जिल्ह्यात हरभरा, गहू पीकांचा पेरा वाढला आहे. त्याच बरोबर ऊस आणि केळीची लागवडही वाढली आहे. या पीकांना पाणी देण्यासाठी महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वेळेनुसारच नियोजन करावे लागत आहे.  रात्रीच्या वेळी जंगल जनावरे तसेच शाॅक लागून अपघात होणे अशा घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी २४ तास वीज पुरवठा करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे.

रात्रीचे भारनियमन जीवघेणेदिवाळीनंतर गहू, हरभरा, हळद, ऊस, केळी यासह विविध पीकांना पाणी देण्याचे नियोजन शेतकऱ्यांकडून केेले जाते. रात्रीच्या वेळी जास्त दाबाने विद्युत पुरवठा होत असल्याने बहुतांश शेतकरी रात्रीच सिंचनाचे नियोजन करतात परंतू रात्रीच्या वेळी जंगली जनावरे, रान डुकर, साप अशा प्राण्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातच ना दुरुस्त मोटारी, काही बिघाड झाल्यास रात्रीच्या वेळी विहीरीत उतरणे अशा प्रकारामुळे अपघात घडून शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. अशा घटना घडलेल्या आहेत.पाऊस चांगला झाल्याने मुबलक पाणीनांदेड जिल्ह्यात यंदा सरासरीच्या १०५ टक्के पाऊस झाल्याने सर्वच धरणे, प्रकल्प तुडूंब भरले आहेत. नांदेड जिल्ह्याची मदार असलेल्या येलदरी, इसापूर, विष्णुपूरी, मानार यासह लघु व मध्यम प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्याचा फायदा शेतीसाठी होणार आहे.इसापूर धरणातून पाणी पाळ्या देण्याचे नियाेजन  कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे. त्यानूसार सिंचनासाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच महावितरणणे देखील पाणी पाळीच्या वेळेज वीज पुरवठा सुरुळीत ठेवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

नांदेड जिल्ह्यात शिफ्टवाईज वीज पुरवठा करण्यात येतो. एकाच वेळी वीजेचा वापर अधिक झाल्याने दाब येवून वीज पुरवठा खंडीत होतो. त्यामुळे आठ-आठ तासांची वीज दिली जाते. भविष्यात सौरऊर्जेचा वापर करुन वीज पुरवठा करण्याचे नियोजन आहे. - संतोष वहाणे,  अधीक्षक अभियंता, नांदेड

महावितरणकडून शेतकऱ्यांना रात्री ११ नंतर अथवा पहाटेच्यावेळी वीज दिली जाते. या वेळेतही वीजेचा दाब मुबलक प्रमाणात नसल्याने मोटारी पाणी ओढत नाहीत. रात्रीच्या वेळी जंगली जनावरांचा सामना करावा लागतो. दिवसा वीज देणे गरजेचे आहे.- परमेश्वर कदम, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीelectricityवीजNandedनांदेड