शहरं
Join us  
Trending Stories
1
विवेकानंद रॉक मेमोरियल इथं ध्यान अवस्थेत बसले PM मोदी; 'असे' असतील पुढचे ४५ तास 
2
Explainer: छगन भुजबळांच्या मनात चाललंय काय?; 'या' ४ घटनांमुळे निर्माण झालं संशयाचं वातावरण
3
आशिष शेलारांनी घेतली राज ठाकरेंची भेट; विधानपरिषदेच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सुटणार?
4
Time Magazine च्या 100 प्रभावशाली कंपन्यांच्या यादीत रिलायन्स, टाटा आणि सीरमचा समावेश
5
गत आर्थिक वर्षांत ६३ बँकांमध्ये १४,५९६ कोटींचे घोटाळे, केवळ ७५४ कोटी वसूल
6
'इंडिया'ची सत्ता आली तर पंतप्रधान कोण होणार? काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांनी दिलं असं उत्तर  
7
धक्कादायक! गटारात स्त्री जातीचं अर्भक सापडलं; साताऱ्यातील घटनेनं खळबळ 
8
२०० पेक्षा अधिक रॅली, रोड शो, सभा, ८० मुलाखती..; देशात PM नरेंद्र मोदींचा तगडा प्रचार
9
"महाराष्ट्रासह या 4 राज्यात काँग्रेस जोरदार मुसंडी मारणार", जयराम रमेश यांचा दावा
10
ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द
11
मृणाल दुसानीसच्या चाहत्यांसाठी खुशखबर! अभिनेत्री लवकरच करणार कलाविश्वात कमबॅक; म्हणाली...
12
रिलायन्सचे पेटीएम, फोनपेला मोठं आव्हान! JioFinance ॲप लाँच; युजर्सना मिळणार 'हे' फायदे
13
"मी भारताकडून खेळणार म्हणजे खेळणारच, बाकी मला...", रियान परागचं विधान
14
६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट
15
" ‘इंडिया’चा विजय झाल्यास ४८ तासांत होणार नव्या पंतप्रधानांची घोषणा, असा असेल निवडीचा फॉर्म्युला’’, जयराम रमेश यांचा दावा
16
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, २१ जणांचा मृत्यू
17
Fact Check : सट्टा बाजाराच्या नावाने व्हायरल होणारी 'लोकसभेची भविष्यवाणी' FAKE; जाणून घ्या सत्य
18
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
19
सलमान, अजय अन् अक्षयनेही नाकारलेला सिनेमा पडला पदरात! अभिनेत्याचं उजळलं नशीब
20
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल

बळीराजा समाधानी; नांदेड जिल्ह्यात झाली रबीची १५६ टक्के पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 8:18 PM

मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ

ठळक मुद्देरबी होणार लाभदायी शेतकऱ्यांमध्ये समाधानहरभरा पेरणीक्षेत्रात वाढ

नांदेड : यंदा झालेल्या पावसामुळे आणि सिंचन क्षेत्र अवलंबून असलेलय येलदरी, इसापूर धरणात मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने यंदा रबीच्या पेरणीक्षेत्रात वाढ झाली आहे़ आजपर्यंत जवळपास १५६ हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे़ 

मृग नक्षत्रानंतर अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला़ त्यामुळे खरीपातील पेरण्या वेळेवर होण्यास मदत झाली़ परंतु, नंतर पावसाने उघडीप दिल्याने पिकांची वाढ खुंटली़ त्यातून उत्पन्न घटनार अशी स्थिती असताना आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने हाती आलेले जवळपास सर्व पीक गेली़ त्यामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक असल्याचे दिसत आहे़ नांदेड जिल्ह्यात रबी पेरणी क्षेत्रात यंदा दीडपट वाढ झाली आहे. 

आजघडीला नांदेड जिल्ह्यात रबी ज्वारी २८० हेक्टर वर पेरली असून त्याची टक्केवारी १०४ एवढी आहे. त्याच बरोबर ५७ टक्के गव्हाची पेरणी पुर्ण झाली आहे. रबी मक्का ८३.३६ टक्के, इतर तृण धान्य ३७९.५५ टक्के, हरभरा २५२.०९ टक्के इतर कड धान्य १५३०९ टक्के यासह तीळ, मोहरी, सुर्यफुल, जवस आदी पिकांची पेरणी झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील रबीचे सर्वसाधारण क्षेत्र १३६७.१२ हेक्टर एवढे आहे. परंतु मुबलक प्रमाणात यंदा पाणी उपलब्ध होत असल्याची बाब लक्षात घेऊन शेतकरऱ्यांनी खरीपाची पेरणी केली आहे. जवळपास २ हजार ९४६ हेक्टरवर खरीपाची पेरणी झाली आहे. यापुढेही ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपाची पेरणी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्यकार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांनी रबी नियोजनासाठी तीन बैठका घेतल्याहोत्या. या बैठकांमध्ये सिंचन, विद्युत पुरवठा तसेच खते व बियाणे याचे नियोजन करण्यासंदर्भात संबंधीतांना वेळोवेळी सुचित केले होते. जिल्ह्यात रबीचे १ लाख ३६ हजार हेक्टर सरासरी क्षेत्र असतांना यंदा २ लाख १४ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली आहे. त्यामुळे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून हिरमुडलेल्या शेतकऱ्यांना यंदाचा रबी हंगाम समाधानकारक ठरेल, अशी अपेक्षा आहे़ 

हरभरा पेरणीक्षेत्रात वाढ; शेतकरी समाधानीयंदा रबीसाठी जवळपास सर्वच प्रकल्पात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे़ विष्णुपूरीसह येलदरी आणि इसापूर धरणातून सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होईल, या अपेक्षेतून शेतकऱ्यांनी रबीतील गहू, हरभरा पेरणीत वाढ केली आहे़ ४जवळपास २५२ टक्के हरभरा पेरणी झाली आहे़ हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६२३ हेक्टर असताना १५७१ हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर जवळपास ५७ टक्के क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे़ थंडीत वाढ झाल्याने पिकपरिस्थतीही चांगली आहे़ 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र