शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

उमरीजवळ तरुण शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 18:02 IST

शेतात पाणी देण्यास गेला असता झाली घटना

उमरी : तालुक्यातील मोखंडी येथे शेतात ऊसाला पाणी देत असताना विजेचा शॉक लागून तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शिवाजी लक्ष्मण नव्हाते ( २१, रा.मोखंडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शिवाजी नव्हाते हा एका मित्रासोबत शेतावर पाणी देण्यासाठी गेला होता. यावेळी सोबतचा मित्र आखाड्यावर  झोपला तर शिवाजी हा पाणी देण्यासाठी शेतात गेला. दरम्यान, विजेच्या जिवंत तारेला स्पर्श होऊन शिवाजीचा जागीच मृत्यू झाला. रात्र असल्याने ही घटना कोणाच्या लक्षात आली नाही. मात्र सकाळी ही घटना उघडकीस आली. मृत शिवाजी याच्या पार्थिवावर मोखंडी येथे  अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवाजी एकुलता एक मुलगा होता. त्यांची मोखंडी गावाच्या शिवारात दीड एकर शेती आहे. आई-वडील ऊस तोड कामगार आहेत. नव्हाते कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या  दुःखद प्रसंगामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूFarmerशेतकरीNandedनांदेड