शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नेत्याच्या प्रेमापोटी फेसबुक लाईव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:38 IST

मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले

ठळक मुद्देमतदानाच्या गोपनीयतेचा सर्रास भंग

नांदेड : मतदारांनी गोपनियतेचा भंग करु नये असा कायदा आहे़ परंतु गुरुवारी झालेल्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत नांदेड जिल्ह्यात अनेकांनी सर्रासपणे गोपनियतेचा भंग करीत कोणत्या उमेदवाराला मत दिले याची छायाचित्रे, व्हिडीओ सोशल मीडियावर झळकविली़ दिवसभर त्यासाठी स्पर्धाच लागली होती़ या प्रकरणात फक्त मांडवीमध्ये एक गुन्हा नोंद झाला आहे़मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल घेवून जाण्यास तसेच त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करण्यास मनाई आहे़ मतदानाच्या गोपनियतेचा भंग होवू नये यासाठी निवडणूक विभागाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर तशी खबरदारी घेतली जाते़ मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही तशा सूचना असतात़ परंतु, गुुरुवारी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारांनी या नियमांना तिलांजली दिली़ नेत्यांना आपल्या स्वामीनिष्ठा दाखविण्यासाठी अनेकांनी सर्रासपणे मतदान केंद्रात मोबाईल नेत मतदान करीत असल्याचे ईव्हीएमचे छायाचित्र काढले़ तर काहींनी त्याहीपुढे जात फेसबुक लाईव्ह केले़ त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर या क्लीप व्हायरल करण्यात आल्या़ दिवसभर त्यासाठी स्पर्धा लागली होती़ काही जणांच्या हातून नकळत ही चूक झाली़ तर काही पक्षाच्या नेत्यांनीही गोपनियतेचा भंग केला़ परंतु याबाबत नांदेड जिल्ह्यात केवळ मांडवी येथे एक गुन्हा दाखल झाला़ मांडवीत हिंगोली लोकसभा निवडणुकीत चावी या चिन्हावर मतदान करीत असलेले छायाचित्र बळीराम पाटील मांडवी या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर टाकण्यात आले होते़ याप्रकरणी प्रफुल्ल भिकू राठोड यांनी तक्रार दिली़ त्यावरुन एका तरुणावर गुन्हा नोंदविण्यात आला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगCrime Newsगुन्हेगारी