शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

नांदेड जिल्ह्यात पाण्यावर पाच वर्षांत १ अब्ज ४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:54 IST

जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १ अब्ज ४ कोटी २६ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षीचा खर्च आणखी निश्चित झाला नाही. यावर्षी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.

ठळक मुद्देनागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम ग्रामीण भागात नळ योजना विशेष दुरूस्तीचे कामे सुरूअडीच हजार लोकसंख्येसाठी एक टँकर पाणी

अनुराग पोवळे ।नांदेड : जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १ अब्ज ४ कोटी २६ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. यावर्षीचा खर्च आणखी निश्चित झाला नाही. यावर्षी जवळपास २५ ते ३० कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी पाच वर्षांत सर्वाधीक ४३ कोटी ५० लाखांचा खर्च २०१६ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर गतवर्षी २७ कोटी १४ लाख रुपये पाणीटंचाई निवारणासाठी खर्च करण्यात आले. २०१६ मध्ये जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी २ हजार ९६० उपाययोजना हाती घेण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधीक खर्च टँकरने पाणीपुरवठा करण्यावर झाला होता. १९ कोटी ९५ लाख रुपये २०१६ मध्ये टँकरने पाणी देण्यासाठी खर्च करण्यात आला. खाजगी विहिरीही अधिग्रहीत करण्यात आल्या. १ हजार ३०९ विहीर अधिग्रहणासाठी १२ कोटी ७१ लाख रुपये खर्च केले. २०१७ मध्येही टँकरचा खर्च मात्र कमी झाला होता. केवळ ४७ टँकरने पाणी देण्यात आले होते. यासाठी १ कोटी ५९ लाख तर खाजगी विहीर अधिग्रहणासाठी सर्वाधीक २ कोटी ८ लाख रुपये खर्च झाले होते. २०१७ मध्ये ५८४ खाजगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले होते. विंधन विहिरीच्या विशेष दुरुस्तीवरही ४० लाख रुपये २०१७ मध्ये आणि ७० लाख रुपये २०१६ मध्ये खर्च झाले होते.२०१८ मध्ये जिल्ह्यात १०९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. ६ कोटी ७० लाख ८९ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. तर विहीर अधिग्रहणासाठी ४ कोटी ८६ लाख रुपये अदा केले.जिल्ह्यात २ हजार २०१४ मध्ये पाणीपुरवठ्याच्या १८४० उपाययोजना करण्यात आल्या होत्या. २०१५ मध्ये २ हजार ४३३, २०१६ मध्ये २ हजार ९६०, २०१७ मध्ये १ हजार ५९० आणि २०१८ मध्ये २ हजार ८२७ उपाययोजना करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात १ आॅक्टोबर २०१८ ते ३० जून २०१९ या कालावधीत ५ हजार २८१ पाणीपुरवठा उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये विंधन विहिरीची दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, टँकरने पाणीपुरवठा, विहीर अधिग्रहण, विहीर खोलीकरण आदी उपाययोजनांचा समावेश आहे. १३०५ गावांमध्ये या उपाययोजना केल्या जाणार आहेत.नळ योजनांच्या ३५१ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. यावर्षी टँकरची संख्या जवळपास ३६५ पर्यंत पोहोचेल असेही कृती आराखड्यात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात नळ योजना विशेष दुरुस्तीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. ही कामे सध्या निविदास्तरावर तर काही कामे प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी पाणीपुरवठा योजनांची तीन लाखापर्यतची कामे २० मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत.पाच वर्षांत २ हजार ८३ बोअर...जिल्ह्यात विंधन विहिरींद्वारेही पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरुच आहे. मागील पाच वर्षात तब्बल २ हजार ८३ विंधन विहिरी प्रशासनाकडून मारण्यात आल्या आहेत. यातील किती विंधन विहिरी कोरड्या गेल्या हा प्रश्नच आहे.२०१४ मध्ये ४५८ विंधन विहिरीसाठी २ कोटी २९ लाख, २०१५ मध्ये १७० विंधन विहिरीसाठी ८५ लाख, २०१६ मध्ये ३५१ विंधन विहिरीसाठी १ कोटी ७५ लाख, २०१७ मध्ये ४२९ विंधन विहिरीसाठी १ कोटी ९२ लाख आणि २०१८ मध्ये ६७५ विंधन विहिरीसाठी ४ कोटी ५ लाख रुपये खर्च करण्यात आला होता.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद