शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 19:52 IST

जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २५़०९ मिमी पावसाची नोंद झाली असून संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्दे घोटी नाल्याला पूर आल्याने किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए वरील पुलाचा वळणरस्ता वाहून गेला़ तामसा नदीवरील पर्यायी पूल रविवारच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने हदगाव व भोकर या दोन तालुक्यांची वाहतूक ठप्प

नांदेड : जिल्ह्यात रविवारी सर्वदूर दमदार स्वरुपाचा पाऊस झाला़  किनवट तालुक्यासह ९ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद  झाली आहे़  जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे अनेक भागात मागील तीन ते चार दिवस सूर्यदर्शनही झालेले नाही़

रविवारी नांदेडसह जिल्ह्यातील विविध भागांत दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती़ रविवारी रात्रीही अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली़  किनवटसह  माहूर, हदगाव आणि  भोकर तालुक्यात  पावसाचा जोर मोठा होता़ सोमवारी सकाळी ८ वाजता वाजेपर्यंत किनवट तालुक्यातील बोधडी ६५़५० मिमी, इस्लापूर ६५़५०, जलधारा ६५़५०, शिवणी ७२, मांडवा ६५़५० मिमी  आणि दहेली मंडळातही ६५़५० मिमी पावसाची नोंद झाली. तर भोकर तालुक्यातील मातूळ मंडळात ६५़५० मिमी, हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात ६७ मिमी आणि माहूर तालुक्यात सिंदखेड मंडळात ६५़५० मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २५़०९ मिमी पावसाची नोंद झाली असून संततधार पावसाने खरीप पिकांचे नुकसान होत आहे. मूग, उडिदाच्या शेंगांना पावसाने मोड फुटत आहे. तसेच सोयाबीनची पानेही पिवळी पडत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

किनवट-माहूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्पकिनवट-माहूर तालुक्यात पडत असलेल्या संततधार पावसाने अनेक नाल्यांचा संगम असलेल्या घोटी नाल्याला पूर आल्याने किनवट माहूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए वरील पुलाचा वळणरस्ता वाहून गेला़ त्यामुळे हा मार्ग पुन्हा २६ दिवसांनंतर ठप्प झाला आहे़ हा मार्ग बंद झाल्याने दुचाकीस्वारांना  कोल्हापुरी बंधाऱ्याच्यावरून जावे लागणार आहे तर  चारचाकी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे़ हा पूल वाहून पुलावरील वळणरस्ता वाहून गेल्याने पोळा सणाच्या बाजारासाठी आलेल्या नागरिकांना घोटीवरून पायी चालत जावे लागले तर किनवटला आलेल्या वाहनांची रस्त्याअभावी कोंडी झाली आहे़

हदगाव-भोकर वाहतूकही दोन दिवसापासून बंद.तामसा नदीवरील पर्यायी पूल रविवारच्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याने हदगाव व भोकर या दोन तालुक्यांची वाहतूक  दोन दिवसांपासून ठप्प झाली आहे. तामसा परिसरात रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. यामुळे तामसा नदीला मोठा पूर आला़ नदीवरील नव्या पुलाचे बांधकाम चालू असून वाहतुकीच्या सोयीसाठी तात्पुरता पर्यायी नळकांडी पूल उभारण्यात आला होता. परंतु, पुलाची एका बाजू पूर्णत: खरडून गेल्यामुळे हदगाव ते भोकर हा वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. सोमवारी दोन्ही बाजूने वाहने मोठ्या प्रमाणात अडकली होती. पोळा सणाच्या आदल्याच दिवशी पूल वाहून गेल्याचा  फटका तामसा भागातील  पंधरा ते वीस गावांतील नागरिक व ग्राहकांना बसला आहे.

विष्णूपुरीचा दरवाजा उघडलाविष्णूपुरी प्रकल्पाच्या वरील भागातून पाण्याचा येवा सुरू असल्यामुळे रविवारी रात्री प्रकल्पाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे़ त्यातून ४३६ क्यूमेक्स वेगाने गोदावरीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे़ वरच्या भागात असलेल्या पूर्णा नदीवरील येलदरी आणि सिद्धेश्वर धरण १०० टक्के भरले        आहे़ या दोन्ही धरणांतून २१६ क्यूमेक्स वेगाने पाणी विष्णूपुरीत दाखल होत आहे़ 

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेडagricultureशेती