शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

मुलांच्या हट्टापायी क्रिकेट खेळणे माजी मंत्र्याच्या अंगलट; कॅच पकडताना पडून झाले जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:34 IST

देवीच्या समोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सावंत यांना क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळावा असा आग्रह केला.

नांदेड : काका तुम्ही आमच्या सोबत क्रिकेट खेळा, असा आग्रह करणाऱ्या मुलांचा हट्ट पूर्ण करायला गेलेल्या माजी मंत्री डी. पी. सावंत यांचा कॅच पकडताना तोल गेला. ते जमिनीवर पडले असता त्यांच्या डोक्याला आणि खांद्याला दुखापत झाली आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. 

नांदेड येथील शिवाजीनगर भागात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या घरासमोर देवी बसविली जाते. याच ठिकाणी माजी मंत्री सावंत याचेही घर आहे. नवरात्रात नऊ दिवस देवीच्या समोर अनेक जण जागरण करत असतात. माजी मंत्री सावंत, काँग्रेसचे काही पदाधिकारी आणि मित्र मंडळी या ठिकाणी गप्पा मारत बसले होते.

दरम्यान, देवीच्या समोरील मोकळ्या मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी सावंत यांना क्रिकेटची आवड असल्याने त्यांनी क्रिकेट खेळावा असा आग्रह केला. त्यानंतर क्रिकेट खेळत असताना बॉल पकडताना ते जमिनीवर पडले. खाली सिमेंट काँक्रिट असल्याने त्यांच्या डोक्याला आणि उजव्या खांद्याला जबर दुखापत झाली. तद्नंतर लगेचच त्यांना नजीकच्या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.  त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

टॅग्स :Nandedनांदेड