शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील प्रदूषणासाठी पर्यावरण विभाग जबाबदार; उद्योगमंत्री देसाईंचा घराचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 12:28 IST

कारखान्यातील जलवायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय.

ठळक मुद्दे स्वतःची पर्यावरण विभागाबाबतची हतबलता अप्रत्यक्षपणे दाखवली. अनेकदा कारवाईची मागणी केली आहे

नांदेड - डोंबिवली  एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यामुळे डोंबिवलीकरांचा जगणं मुश्किल झाल आहे. कारखान्यातील जलवायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना इथल्या नागरिकांना करावा लागतोय. त्यासाठी पर्यावरण विभाग जबाबदार असल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केला आहे. कृष्णर एमआयडीसीतील जागांची पाहणी करण्यासाठी बुधवारी ते नांदेड दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी ते बोलत होते.

देसाई म्हणाले, डोंबिवलीत हिरवा पाऊस पडला होता. तर मागच्याच वर्षी एमआयडीसीच्या दावडी गावात गणेशमूर्ती काळवंडल्याचा प्रकार घडला होता. नाल्यात हिरवं, लाल रंगाचं पाणी येणं, घरातल्या भांड्यांवर काळ्या पावडरचा थर जमणं हे प्रकारही डोंबिवलीकरांना नवीन नाहीत. कारखान्यातून होणारे जल वायू प्रदूषणावर कारवाई करण्याचे अधिकार हे पर्यावरण विभागाला आहेत. मी स्वतः अनेकदा कारवाईची मागणी केली आहे म्हणत स्वतःची पर्यावरण विभागाबाबतची हतबलता अप्रत्यक्षपणे दाखवली. 

डोंबिवली एमआयडीसीमधली प्रोबेस  कंपनीत मागच्या वर्षी २६ मे रोजी भीषण स्फोट झाला होता. स्फोट इतका भीषण होता, की कंपनीचे मालक असलेल्या वाकटकर यांची दोन्ही मुलं, सून यांच्यासह एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता, तर २०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. प्रोबेसचा स्फोट यामुळं डोंबिवलीच्या मानवी वस्तीत असलेल्या या कंपन्या इथून हलवाव्यात, अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राज्याच्या उद्योगमंत्र्यांनी या कंपन्या स्थलांतरित करण्याचं आश्वासन दिलं होतं. पण अजूनही या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. कारखानदारांच्या संघटनांशी आम्ही बोललो पण त्यांनी स्थलांतरणास नकार दिलाय त्यामुळे आता शासन एकतर्फी निर्णय घेण्याचा विचार करत आहे. पर्यायी जागाही शासनाने शोधली असल्याची माहिती उदयॊग्यमंत्र्यांनी दिलीय.

टॅग्स :pollutionप्रदूषणAditya Thackreyआदित्य ठाकरेSubhash Desaiसुभाष देसाईdombivaliडोंबिवलीNandedनांदेड