शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

नांदेड जि़प़च्या औषधी भांडार विभागाचे प्रवेशद्वार महिनाभरापासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:27 IST

वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून पडले आहे़ झाड उचलण्यासाठी जि़प़ बांधकाम विभागाने मनपाची परवानगी मागितली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : वादळी वारे व पावसामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या औषधी भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावरच पडलेले झाड महिनाभरानंतरही काढण्यात आले नाही़ प्रवेशद्वार बंदच असल्याने औषधी वाहतूूक करणारे वाहन मधेच अडकले आहे़ ऐन पावसाळ्यात औषधीची वाहतूक करणारे वाहन अडकून पडले आहे़ झाड उचलण्यासाठी जि़प़ बांधकाम विभागाने मनपाची परवानगी मागितली आहे़जिल्हा परिषद प्रांगणात असलेले हे झाड १६ जून रोजी वादळी वारे व पावसामुळे उन्मळुन पडले़ त्यानंतर हे झाड उचलन्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने महापालिकेकडे एक पत्र पाठवून सदर झाड पडल्याची माहिती कळवली़महापालिकेने हे पत्र आल्यानंतरही कोणतीही कार्यवाही केली नाही़ परिणामी १६ जून पासून जिल्हा परिषदेच्या प्रांगणातील हे झाड आरोग्य विभागाच्या भांडार कक्षाच्या प्रवेश द्वारावर तसेच पडून आहे़ विशेष म्हणजे या भांडार कक्षात एक औषधी वाहतूक करणारे वाहन मध्येच अडकले आहे़झाड काढण्या ऐवजी जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने महापालिकेकडे संपर्क साधत लातूरहून औषधी आणण्यासाठी महापालिकेचे वाहन ताब्यात घेवून लातूरहून औषधी आणल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़व्ही़आऱमेकाने यांनी सांगितले़दुसरीकडे हे झाड प्रवेश द्वारावरुन काढण्याची तसदी जि़प़बांधकाम विभागाने घेतली नाही़ यापूर्वी जिल्हा परिषद प्रांगणातील काही झाडे विना परवानाच तोडण्यात आली होती़ त्या प्रकरणाची मोठी चर्चा झाली़ परिणामी पावसामुळे पडलेले झाड ही उचलण्याची तसदी बांधकाम विभागाने घेतली नाही़जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या कार्यालयातील अंतर हाकेचे आहे़ या दोन कार्यालयातील विसंवादामुळे जवळपासच महिनाभर आरोग्य विभागासाठी महत्वाचा असलेला औषधी भांडार कक्षाचे प्रवेशद्वार बंद राहते ही बाब पावसाळ्यात तरी निश्चितपणे गंभीर आहे़---‘पडलेले झाड उचलण्यासाठी परवानगीची गरज नाही’जिल्हा परिषद प्रांगणातील पडलेल्या झाडाबाबत पत्र मिळाल्याचे मनपा उद्यान अधीक्षक डॉ़मिर्झा बेग यांनी सांगितले़ सदर झाड वादळी वारे व पावसामुळे पडले आहे़ ते झाड तोडले नाही, परिणामी झाड उचलण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज नाही़ याबाबत महापालिकेकडून जिल्हा परिषदेला कळविण्यात आले आहे़ जिल्हा परिषद हे झाड काढून घेवू शकते असे ही डॉ़बेग यांनी स्पष्ट केले़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदmedicineऔषधं