शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘माणसाळलेली रात्र’ ने केले अवयवदानाविषयी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 00:17 IST

या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे.

ठळक मुद्देहौशी राज्य नाट्यस्पर्धा : परभणीची प्रबोधन सेवा संस्था चमकली

नांदेड : नाटक हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर ते समाज प्रबोधनाचेही माध्यम आहे. अनेक नामवंत लेखक, रंगकर्मींनी नाटकातून समाजप्रबोधनाचे धडे दिले आहेत़ आणि या माध्यमातून त्या-त्या वेळच्या समस्या, अडचणींवर मात करण्याचे बळ दिले़ याचा सकारात्मक प्रतिसादही दिसत आला आहे. काळानुरूप लोकांचे विचार बदलले असले तरी आपल्या आजूबाजूस नवीन वेगवेगळ्या समस्या, प्रश्न उभे राहतात़ या प्रश्नावरही नाटकाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे जनजागृती करता येऊ शकते, हे माणसाळलेली रात्र या नाटकाने दाखवून दिले़ अवयवदानाविषयी संदेश त्यांनी दिला़परभणीच्या प्रबोधन सेवाभावी संस्थेने सादर केलेले हे नाटक उदय कातनेश्वरकर यांनी लिहिलेले असून अनुजा डावरे यांनी दिग्दर्शित केले आहे़ हे संपूर्ण नाटक एका स्मशानभूमीत घडते़ स्मशानभूमीतील मसणजोगी (उदय कातनेश्वरकर) याच्याशी विविध आत्मे थेट बोलत असतात. त्या ठिकाणी एक भुरटाचोर बाबल्या (भरड क्षिप्रसाधन) येतो़ त्याला स्मशानभूमीत जळत असलेल्या एका शवावरील दागिना लांबवायचा असतो़ या चोराचा भाऊ अपंग असतो़ त्याच्या दवाखान्यासाठी त्याला पैसे हवे असतात़ परंतु, ज्याच्यासाठी त्याला पैसे हवे असतात, तो मयत झालेला असतो याची या चोराला माहिती नसते. दरम्यान, याच स्मशानभूमीत कार अपघातात मयत झालेली निलू (ऐश्वर्या डावरे) येते़ या निलूने आपले स्वत:चे अवयवदान केलेले असतात. अशा पद्धतीने स्मशानभूमीत मसनजोग्यासह भुरटाचोर बाबल्या आणि मयत निलू एकत्र येतात़ या तिघांचेही विचार अतिशय भिन्न असतात़ मसणजोग्यास माणूस खूप दुष्ट आहे, असे वाटत असते़ तर बाबल्याचा माणसावर विश्वास असतो़ तर निलूचे मत आणखीनच वेगळे असते़ माणूस कसाही असो, आपण आपल्या पद्धतीने चांगला विचार केला पाहिजे, अशी ती सांगत असते़ या तिघांतील याच विषयावरील चर्चेतून मसणजोग्याचेही मत परिवर्तित होते़नाटकात दिग्दर्शकाचे काम उठून दिसते़ ऋग्वेद कुलकर्णी या बालकलावंताने साकारलेली भूमिकाही लक्षवेधी ठरली़ तर भरड क्षिप्रसाधन, उदय कातनेश्वरकर, ऐश्वर्या डावरे, संकेत पांडे यांनीही आपापल्या भूमिकेस न्याय दिला आहे़ नाटकाचे नेपथ्य संकेत पांडे आणि संजय कातनेश्वरकर यांनी साकारले तर दिगंबर दिवाण यांची प्रकाशयोजना सत्याचा आभास निर्माण करणारी होती. उषाताई डावरे यांनी रंगभूषा व वेशभूषेची बाजू सांभाळली तर संगीत उपेंद्र दुधगावकर आणि मंदार कातनेश्वरकर यांनी साकारले़ दरम्यान, बुधवारी सायंकाळी ७ वाजता सरस्वती प्रतिष्ठान, नांदेडच्या वतीने राजेंद्र पोळ लिखित, सुहास देशपांडे दिग्दर्शित वारूळ या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडTheatreनाटक