शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उकळते दूध सांडल्याने चिमुकल्याचा अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:52 IST

शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़

ठळक मुद्देस्त्री रुग्णालयातील घटना : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या दोन वर्षीय बाळाच्या अंगावर गरम दुधाचे भरलेले पातेले पडल्याने बाळाचा भाजून मृत्यू झाल्याची घटना घडली़ या प्रकरणात नातेवाईकांनी परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे़सांगवी येथील प्रतीक वायवळ या दोन वर्षीय मुलाला सोमवारी अशक्तपणामुळे उपचारासाठी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू केंद्रात दाखल केले होते़ या ठिकाणी प्रतीकवर उपचार सुरु होते़ शुक्रवारी दुपारी प्रतीकची आई जेवणानंतर बेडवर बसलेली होती़ तर प्रतीक हा खाली खेळत होता़ त्याचवेळी परिचारिकेने मुलांना देण्यासाठी गरम दूध आणले़ दुधाचे पातेले एका टेबलावर ठेवले होते़ त्याचवेळी प्रतीकचा टेबलला पाय लागल्याने गरम दुधाचे पातेले त्याच्या अंगावर पडले़ त्यामुळे तो ६० टक्के भाजल्या गेल्या होता़ नातेवाईकांनी उपचारासाठी त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले़ परंतु या ठिकाणी शनिवारी त्याचा उपचारा- दरम्यान मृत्यू झाला़याप्रकरणात परिचारिकेच्या निष्काळजीपणामुळेच प्रतीकचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला होता़ तसेच या प्रकरणात परिचारिकेवर कारवाई करण्याची मागणी केली होती़ याबाबत त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांची भेट घेतली होती़ या प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़बी़पीक़दम यांनी चौकशी करुन दोषी आढळल्यास परिचारिकेवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रतीकच्या कुटुंबियांना दिले़दरम्यान, दोन दिवसांपूर्वी श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयात छत कोसळून मातेसह चिमुकले जखमी झाल्याची घटना घडली होती़ या घटनेत सुदैवाने चिमुकल्याचा जीव वाचला होता़ त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ही घटना घडली़ त्यामुळे श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाच्या कारभाराबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़सोयीसुविधांबाबत नेहमीच होते ओरडडॉ़पुष्पा हंगरगेकर यांच्या काळात श्यामनगर येथील स्त्री रुग्णालयाचे काम उत्कृष्टपणे सुरु होते़ रुग्णालयाच्या कामकाजाची अनेकवेळा प्रशंसाही करण्यात आली होती़ परंतु त्या पदावरुन दूर होताच या रुग्णालयाला अवकळा आली़ या ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉक्टर, परिचारिकांची मनमानी वाढली़ अनेकवेळा दिवसा अन् रात्री प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना दाखल करुन घेतले जात नाही़ कर्मचाºयांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत त्यांना थेट विष्णूपुरी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो़ अनेक कर्मचारी तर नावालाच रुग्णालयात हजेरी लावून जातात़ त्यामुळे या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत आता जिल्हाधिकाºयांनीच लक्ष घालण्याची गरज आहे़