शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

रोजगार हमी योजनेची कामे ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:07 IST

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी ...

ठळक मुद्देश्रीक्षेत्र माहूर वानोळा परिसरातील मजुरांचे शहराकडे स्थलांतर, रोजगार मिळेना

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील वानोळा परिसरात खरीप हंगामानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सर्वाधिक रोजगार उपलब्ध होतो मात्र यावर्षी रोहयोची कामे ठप्प आहेत. मजुरांच्या हाताला काम व कुटुंबाकडे चरितार्थ चालविण्यासाठी दाम उपलब्ध होत नसल्याने शहराकडे ग्रामिणांचे स्थलांतर वाढले आहे.वानोळा परिसरात खरिपात सर्वाधिक रोजगार शेतीमधून निर्माण होतो. तर रबी हंगामानंतर त्यांना रोजगार पुरविते, ती राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना. शासनाने या रोजगार हमी योजनेला कायद्याचे स्वरूप दिले आहे.प्रत्येक हाताला काम व कामानुसार दाम हे या योजनेचे ब्रीदवाक्य आहे़१०० दिवस रोजगार पुरविण्याची हमी या योजनेत आहे. रोजगार न मिळाल्यास बेरोजगार भत्ता देण्याचे प्रावधानही आहे. परंतु, वानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी ही योजना मृगजळ ठरू पाहत आहे. रोजगार दिला जात नसताना एकाही बेरोजगाराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही, ही बाबही वास्तविकता दाखविणारी आहे. सन २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत. कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे. आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहे. आता निवडणूक संपली तरीही कामे सुरु होण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे शहरी भागात स्थलांतर होत आहे.कुशल कामाचे वेतन थकीतवानोळा परिसरात रोहयो कुशल कामाचे दोन वर्षांपासून लाखोंचे वेतन थकीत असल्याने रोजगार हमी योजनेकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याचा परिणाम जाणवत आहे. काही ग्रामपंचायतींनी कामाची मागणी करूनही प्रशासनाने कामे उपलब्ध करून दिली नाहीत, असा आरोपही ग्रा़पं़सदस्यांनी केला. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे पैसेही लाभार्थ्यांच्या खात्यात न आल्याने साहित्य पुरवठादार चकरा मारत आहेत. रोहयो तांत्रिक पॅनेल अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालविली जाते, यामध्ये अंदाजपत्रके व प्रत्यक्ष काम सुरू करून मोजमाप व देयके बनविण्याच्या कामाचा समावेश आहे.रोजगार नसलेल्या मजुराला भत्ता मिळेनावानोळा परिसरातील आठ हजार मजुरांसाठी रोजगार हमी योजना मृगजळ ठरू पाहत आहे़ रोजगार दिला जात नसताना एकाही मजुराला बेरोजगार भत्ता देण्यात आलेला नाही. २०१८-२०१९ या वर्षात रोजगार हमीची कामे कमालीची रोडावली आहेत़ कामे पुरवणारी यंत्रणा सुस्त आहे़आजपर्यंत लोकसभा निवडणूक व आचारसंहितेचे कारण त्यासाठी अधिकारीवर्गाकडून दिले जात आहेत़ मात्र आता निवडणूक संपली असतानाही रोहयोची कामे सुरु होण्याची चिन्हे दिसून येत नाहीत़या पॅनलमधील काही अधिकारी दुसऱ्यांच्या नावे कंत्राट घेत ठेकेदारी करीत असल्याने त्यांचे रोहयोकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मजुरांकडून होत आहे. मजुरांनी हाताला काम मिळावे, अशी मागणी केली आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषद